शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रामध्ये नको: अ.भा. किसान संघर्ष समन्वय समितीचा ५ नोव्हेंबरला रास्ता रोको


पुणे – केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती या सर्व शेतकरी संघटनाची आज पुणे येथे बैठक पार पडली. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरविण्यात आली. येत्या ५ नोव्हेबरला राज्यात ठीकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना भेटून शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रामध्ये लागू न करण्याबाबत निवेदने देण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.

पुणे येथे आज २८ ऑक्टोंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती बैठक पार पडली. देशातील २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांची एकजूट असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या इकाईचे गठन करत आपल्या राज्यातही लढा देण्याचे निश्चित झाले आहे.  दिनांक २६ व २७ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमाचे आज नियोजन करण्यात आले.  

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची चिंता आणि सुपुत्राला पब आणि बारची चिंता- आशिष शेलार

२६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्रात ठीक ठिकाणी बैठका होत आहेत, १८ नोव्हेंबरला अलिबाग येथे पुढील बैठक पार पडणार आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले. या वेळी मा.खा राजू शेट्टी, कॉ. डॉ. अशोक ढवळे,  कॉ. बाबा आढाव, प्रतिभा शिंदे, राजेंद्र कोरडे,भाई राहुल पोकळे, किशोर ढमाले,सुभाष वारे, मारुती भापकर,चंद्रशेखर पाटील, मोहन गुंड, संपतराव पाटील, नितीन बनसोडे आदी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love