सूर्याचे पूजन आणि अर्घ्य का?

अध्यात्म महाराष्ट्र
Spread the love

ईश्वराचे प्रत्यक्ष रूप -सूर्य पृथ्वीच्या समस्त जीवांचा आधार आहे. भारतीय चिंतनाच्या अनुसार सूर्योपासना केल्याविना कोणताही मनुष्य कोणत्याही शुभ कार्याचा अधिकारी मानला जात नाही. “सूर्योपासनेचे शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन आहे. ऋग्वेदात (मंडल १, सूक्त ११५, मंत्र १) येते: सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च ।

संपूर्ण जगाचा आत्मा सूर्य आहे. सूर्याची उपासना करणाऱ्याला दुःख, दारिद्र्य, निर्धनता, दीनता-हीनता स्पर्शही करू शकत नाही. शीघ्रच बुद्धीचा विकास, रोग दोषांचे शमन हे साफल्य त्याला मिळते.

रोज प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी स्नानादीतून निवृत्त होऊन मोकळ्या मैदानात अथवा घराच्या गच्चीवर जेथे सूर्याचा चांगला प्रकाश पडत असेल तेथे नाभीचा भाग उघडा करून सूर्यदेवापुढे उभे राहून (अथवा आसनावर बसून) त्यांना नमस्कार करा आणि डोळे बंद करून चिंतन करा की ‘जो सूर्याचा आत्मा आहे,तोच माझा आत्मा आहे. तत्त्वरूपाने दोघांची शक्ती समान आहे.’ मग डोळे उघडून नाभीवर सूर्याच्या नीलवर्णाचे आवाहन करा आणि या मंत्राचे उच्चारण करा :

ॐ सूर्याय नमः । ॐ मित्राय नमः । ॐ रवये नमः । ॐ भानवे नमः । ॐ खगाय नमः । ॐ पूष्णे नमः । ॐ हिरण्यगर्भाय नमः । ॐ मरीचये नमः । ॐ आदित्याय नमः । ॐ सवित्रे नमः । ॐ अर्काय नमः । ॐ भास्कराय नमः । ॐ श्रीसवितृसूर्यनारायणाय नमः ।

सूर्य-पूजेचे लाभ

सूर्योपासनेने स्मरणशक्ती, निर्णयशक्ती व पचनशक्ती विकसित होते. सर्दी, खोकला, दमा यांसारखे रोग वायू व कफामुळे असतील तर दूर होतात. शीत प्रकृतीच्या व्यक्तींनी सदैव सूर्य पूजा केली पाहिजे. मासिक पाळीच्या दिवसांत तसेच सगर्भावस्थेत महिलांनी सूर्य पूजा करू नये. उन्हाळ्यात ८ वाजेपर्यंत व अन्य ऋतूंमध्ये ९ वाजेपर्यंत पूजा आटोपली पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा सूर्य (ढगांच्या बाहेर निघेल तेव्हा सूर्य-पूजा करू शकता.”

सूर्य- अर्ध्याचा विधी आणि त्याचे लाभ

सूर्य बुद्धिशक्तीचा स्वामी आहे. सूर्याला मंत्रोच्चारणासह अर्घ्य दिल्याने बुद्धी कुशाग्र होते आणि परावर्तित सूर्यकिरणे, आपली श्रद्धा, मंत्राचे सामर्थ्य व सूर्यनारायणाची कृपा -या सर्वांचा लाभही मिळतो. भगवान सूर्यनारायण प्रसन्न होऊन आयुष्य, आरोग्य, धन-धान्य, तेज, वीर्य, यश-कीर्ती वगैरे प्रदान करतात.

“भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य देणे म्हणजे आपल्या मतीसाठी व आपल्या कुटुंबासाठी एक सुंदर भेट प्राप्त करणे आहे. स्नान करून अर्घ्य दिले पाहिजे. सूर्योदयाच्या वेळी तांब्यात पाणी भरून त्यात शक्यतो लाल फूल, लाल चंदन, अक्षता, कुंकू वगैरे टाकून सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे. जेथे अर्ध्याचे जल पडेल तेथील ओल्या मातीचा टिळा लावावा. मग डोळे बंद करून मनोमन सूर्याला पहावे आणि गुरुमंत्र अथवा तर ॐ ह्रां ह्रीं सः सूर्याय नमः ।’ या बीजसंयुक्त सूर्यमंत्राचा जप करावा. यामुळे बुद्धी सात्त्विक, विकसित होते आणि निर्भयतेचा लाभ होतो.

सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्याला सहजच सूर्यकिरणयुक्त जल-चिकित्सेचा लाभ मिळतो. बौद्धिक शक्तीत चमत्कारिक लाभ होतो. ओज तेज वाढते. मनुष्यासाठी सर्वच प्रकारे कल्याणकारी आपल्या ऋषींचा हा शोध एक वैज्ञानिक उपचारही लाभ सिद्ध झाला आहे. त्यांच्या अनुसार सूर्याला जल अर्घ्य दिल्याने तसेच सूर्याला जलधारेत पाहिल्याने नेत्रज्योती वाढते.

सूर्य- अर्घ्य कशाप्रकारे दिले पाहिजे?

“दोन्ही हात वर करून अर्ध्य अशा पद्धतीने द्या की जलधारेला पार करून येणारी सूर्यकिरणे आपल्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरावर पडतील. सूर्याच्या परावर्तित किरणांचा  तुमच्या आज्ञाचक्रावर (पीनियल ग्रंथी) प्रभाव पडेल. तुमच्या भावनेचा तुमच्या मनावर प्रभाव पडेल. सूर्याची जी किरणे येतात ती सप्तरंगांच्या 3 सूक्ष्मतम इंद्रधनुष्याचे तरंग बनतात, यामुळे धारणाशक्तीपासून सप्तकेंद्रांपर्यंत मदत मिळेल. तुमच्या आरोग्याचे रक्षण बाहेरून तर होतेच आणि तुमचा सद्भाव, आत्मभाव जागृत करण्याची संधीसुद्धा लोटाभर पाण्याने तुम्हाला मिळते. त्यावेळी नाभीला सूर्यकिरणे स्पर्श करीत असतील तर आणखी उत्तम ! नाभीपासून अर्धा सेंटीमीटर वर सौर्य-केंद्र आहे, जे सूर्याची ऊर्जा घेऊन तुमच्या संपूर्ण शरीराला स्वस्थ ठेवण्यास मदत करते. “

विज्ञानाने मानले सूर्योपासनेचे महत्त्व

यूनानी (ग्रीक) लोकांनी सूर्य चिकित्सा सूर्य पूजेच्या वैदिक ज्ञानाच्या आधारावर विकसित केली होती. कित्येक पाश्चात्य डॉक्टर सूर्य चिकित्सेने आता लाभ घेण्यासाठी तत्पर झाले आहेत..

“सूर्यात जितकी रोगनाशक शक्ती आहे तितकी जगातील अन्य कोणत्याही पदार्थात नाही. कॅन्सर, सडलेली जखम, भगंदर (फिस्ट्युला) इ. दुःसाध्य रोग, जे विजेच्या अथवा रेडिअमच्या प्रयोगानेही ठीक केले जाऊ शकत नाहीत, ते सूर्यकिरणांच्या प्रयोगाने दूर झाले आहेत.”

वैद्यकीय तज्ञाच्या मते यांच्या चिकित्सालयात ज्यांचा ऑपरेशनविना उपचार होऊ शकत नसेल अशा रुग्णांचा सूर्यकिरणांद्वारे यशस्वीरित्या उपचार केला जातो. तर “क्षयरोगाच्या रुग्णांसाठी सूर्य चिकित्सेहून श्रेष्ठ दुसरे कोणतेही औषध नाही.”

सुप्रसिद्ध दार्शनिक न्योची म्हणतात की “या जगात सूर्य विद्यमान असताना लोक व्यर्थच औषधांच्या शोधात भटकत राहतात. त्यांनी तर शक्ती, सौंदर्य व आरोग्याचे केंद्र असलेल्या सूर्याच्या किरणांचा लाभ घ्यावा आणि त्याच्या मदतीने आपली खरी अवस्था (आरोग्य वगैरे) प्राप्त करून घ्यावी.”

चीनचे डॉ. फीनसीन यांचे मत आहे : “जेव्हा सूर्याची किरणे विनामूल्य अमृताचा वर्षाव करतात तेव्हा मग विषारी, महागड्या, कडू व कष्टसाध्य औषधांचे लोक का सेवन करतात ?”

सूर्याच्या किरणांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ वगैरे असते. वैज्ञानिक आता सांगतात परंतु हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषींनी सांगितले आहे की सूर्य आरोग्य-प्रदायक आहे. परंतु आपण केवळ आरोग्यासाठी सूर्याची उपासना करीत नाही; सूर्याची किरणे त्वचेत प्रविष्ट होऊन व्हिटॅमिन ‘डी’ देतील आणि त्वचेच्या रोगांमध्ये लाभ होईल- केवळ यासाठी आपण सूर्योपासना करीत नाही. सूर्यस्नानाने भौतिक लाभ तर होईल परंतु आपला दृष्टिकोण केवळ आधि भौतिक लाभ घेऊन मरणाऱ्या शरीरापर्यंतच सीमित नाही. आपल्या भारतीय ऋषींची दृष्टी अमर आत्मा परमात्म्याच्या प्राप्तीवर केंद्रित आहे आणि बाकीचे हे साहाय्यक लाभ तर असेच (आपोआपच) होणार आहेत.’

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *