Uddhav Thackeray's shortsightedness to call the saffron flag a flag

जितेंद्र आव्हाड यांचा शरद पवारांनी राजीनामा घ्यावा – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे—भाजपच्या महिला पदाधिकार्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेत केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनच्यावर महिलेच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आव्हाडांच्या गुन्ह्याचं सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. हे फुटेज पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

बावनकुळे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गुन्हे दाखल झालेले नाहीत. सर्व घटना सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद आहे. राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर शरद पवारांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा. आव्हाड यांची स्टंटबाजी यापुढे चालणार नाही. कारण आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील नाही, तर देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच कोणी आव्हाड यांचे समर्थन करत असेल तर त्यांनाही  गुन्ह्यात घ्यायला हवं. असंही ते म्हणाले.

पवार कुटुंबियांनी बारामतीमध्ये ६० वर्षे सत्ता केली,सरकार चालवलं. तर त्यांनी उपकार केले नाहीत. बारामतीत दहशत आहे. आता  शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमध्ये दहशत नव्हती. त्यांना शिंदेंचं नेतृत्व आवडलं त्यामुळे ते शिंदेंसोबत गेले, असं बावकुळे म्हणाले.

शिंदे गट-भाजप सध्या एकत्र आहे. येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूका लढवणार आहे, असंही बावनकुळेंनी सांगितलं.

गजानन कीर्तिकर यांच्या शिंदेगटात प्रवेशावरून बावनकुळे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. कीर्तिकर यांनी शिवसेनेसाठी कष्ट घेतले. सेना घराघरापर्यंत पोहचवली. मग त्यांना ठाकरेगट का सोडावा लागला? उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त चार लोक उरतील, असं बावनकुळे म्हणालेत.

जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली होती. “राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. विरोधात बोलणाऱ्यांवर खोटे आरोप केल्या जात आहे. अशा आरोपांमुळे कुटुंब उद्धवस्त होतात. आज आमच्यावर ही वेळ आली आहे, उद्या ही वेळ कोणावरही येऊ शकते. यासाठी राज्यात ईडी सरकार अस्थित्त्वात आले का? एकतर कोणाला प्रलोभनं द्या किंवा दपडशाही करा, एवढंच काम सध्या ईडी सरकार करते आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *