‘देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी’- सुप्रिया सुळे

नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक
नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक

पुणे–महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत माझ्यावर केसेस टाकण्याचा, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आले होते या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी खंडन केले आहे. ‘देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी’, असा टोला लगावतानाच सुळे म्हणाल्या, अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडल्या आहेत यावर राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी बोलणं अपेक्षित होतं.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे या परिस्थितीवर त्यांनी बोलायला पाहिजे. पण त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले याचं मला आश्चर्य वाटत आहे. त्यांना विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशी परिस्थिती त्यांनी यावर बोलावे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अधिक वाचा  ...म्हणून लतादीदींचा स्वर जगावर अधिराज्य करतो - रामदास फुटाणे

चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल…

चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया देताना भाजपा कोणाला उमेदवारी देणार हे माहिती नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ही चिंचवड मतदारसंघाची निवडणुका बिनविरोध करण्याविषयी मी तर्कवितर्क लावू शकत नाही असं सुळे म्हणाल्या आहेत. तसेच चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल. अजित पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असंही सुळे म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love