चरित्र सावरकरांचे त्यांच्याच काव्यातून : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम


पुणे-  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त, स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह निमित्त आज २८ मे रोजी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक केंद्र या  नाट्यगृहात दुपारी “चरित्र सावरकरांचे त्यांच्या च काव्यातून” हा अप्रतिम  कार्यक्रम सादर झाला.  सावरकरांच्या लेखणीतून अजरामर झालेल्या काव्याची , तसेच त्यांच्या जीवनातील प्रसंगांची गुंफण घालत सादरीकरण केले “संस्कार भारती-पुणे महानगर, महाराष्ट्र टुरिझम, विवेक व्यासपीठ या संस्थांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची संहिता  सावरकरांचे अभ्यासक आणि वंदे मातरम् गीताचे अभ्यासक श्री. मिलिंद जी सबनीस यांनी लिहिली आहे. अश्विनी पटवर्धन, हिमानी नांदे, देवव्रत भातखंडे, ओंकार कपलाने, होनराज मावळे आणि संजीव मेहेंदळे  या  गायक कलाकारांना संगीतकार अजयजी पराड  यांची संवादिनीसाथ, कीबोर्डसाठी तुषार दीक्षित, तबला व ढोलकीची साथ चिन्मय वाईकर यांनी तर तालवाद्यसाथ ओंकार जोशी यांनी अत्यंत समर्थपणे केली.

अधिक वाचा  मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार- मुरलीधर मोहोळ

कार्यक्रमात स्वा. सावरकरांनी वेगवेगळ्या काव्यप्रकारांत दिलेले योगदान विचारात घेऊन सादरीकरण केले गेले. त्याचा सारांश म्हणून कार्यक्रमाची सुरूवात फटका  अन्यायप्रवणांना दंडू याने झाली.

त्याच बरोबर प्रेमगीत: तनुवेल,  लावणी: छंद नसे चांगला, छत्रपती शिवरायांची आरती: जय देव जय देव जयजय शिवराया, पोवाडा त्याचबरोबर पुरूष व स्री गायकांनी एकत्र गायलेली गाणी: जयोस्तुते श्री महन्मंगले, तुम्ही आम्ही सकल हिंदू असे भारावून टाकणारे सादरीकरण झाले.

गीत व काव्यवाचन एकत्रितरित्या असलेले गाणे: ‘ये मृत्यो ये, तू ये’ हे ऐकून तर अक्षरशः डोळ्यात पाणी आले.

तालवाद्याशिवाय गायलेले गाणे: माझे मृत्युपत्र आणि काव्यवाचन: सप्तर्षी, सांत्वन नाट्यगीते: शतजन्म शोधिताना, सुकताताचि जगि या हेही विशेष ठरले.

कार्यक्रमाचा शेवट: अनादि मी अनंत मी या गाण्याने झाले.

अधिक वाचा  1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद उपस्थित राहणार

कार्यक्रमाचे संगीत आणि संयोजन श्री.अजयजी पराड यांनी केले. तांत्रिक सहाय्य प्रसाद कुलकर्णी यांनी केले, निवेदन सावनी केळकर यांनी केले. ध्वनी व्यवस्था मुकेश यांनी सांभाळली.

कार्यक्रमाचा शुभारंभ  हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मा.नगरसेविका सौ.कालिंदी ताई पुंडे यांच्या हस्ते सावरकरांच्या   प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला मा. नगरसेविका सौ. कालींदी पुंडे,  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष श्री सचिन मथुरावाला , समीरजी शेंडकर पुणे शहर सचिव सौ. कोमल शेंडकर,  प्रभाग अध्यक्ष श्री विवेक शिंदे  प्रभाग अध्यक्ष सौ. सुरेखाताई गायकवाड यांची उपस्थिती लाभली.  संस्कारभारती पश्चिम प्रांत महामंत्री केशव कुलकर्णी, पुणे महानगर-सचिव धनश्री देवी, संघटन प्रमुख नितीन क्षीरसागर, सह सचिव योगेश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम संयोजन किशोर कोरडे यांनी केले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love