अहमदनगर ओळखले जाणार ‘अहिल्यानगर’ म्हणून : मुख्यमंत्र्यांची घोषणा


पुणे(प्रतिनिधि)–अहमदनगर जिल्ह्याचं (ahmednagar) लवकरच नामांतर करून अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) म्हणून ओळखला जाईल, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती आज साजरी केली जात आहे. या निमित्ताने अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या नगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ म्हणून ओळखला जाईल, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.  अहमदनगर नामांतर करण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचं भाग्य आहे. तसेच हे नामांतर झाल्यामुळे नगर जिल्ह्याचा मान देखील हिमालयाएवढा होणार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अधिक वाचा  मनसेने भाजपशी युती करावी

अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करावे, अशी दीर्घकाळापासून मागणी केली जात होती. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळे अहमदनगरच लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करण्याचा राज्य सरकराने निर्णय घेतला आहे. या सोहळ्याचे साक्षीदार मी आणि देवेंद्र फडणवीस झालो, याचा मला अभिमान आहे. नामांतर केल्यामुळे नगरचा मान देखील वाढणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर तत्काळ या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दर्शविला. आपल्या राज्याचा मुख्यमंत्रीच छत्रपतींचा मावळा आहे. त्यामुळे अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर केले. तसेच उस्मानाबादचे नामकरण धाराशिव केले. त्यामुळे आता अहमदनगरचेही नाव अहिल्यानगर होणारच, असए देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांची विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या

अहमदनगरचे नाव अहिल्यानगर नामांतर करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. अनेक सामाजिक संघटनांकडूनही याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर व्हावे यासाठी यात्राही काढण्यात आली होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love