काही वर्षांत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक करण्याचा मानस – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक : सर्व एसटी बसेस आणि डेपोचे आधुनिकीकरण करणार

काही वर्षांत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक करणार
काही वर्षांत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक करणार

पुणे(प्रतिनिधी) – एसटीच्या ताफ्यात वर्षाला ५ हजार नवीन बस घेण्याचे नियोजन असून, त्यापैकी १ हजार बस इलेक्ट्रिक असाव्यात असे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक [Transport Minister Pratap Sarnaik] यांनी व्यक्त केले. दरम्यान, पुढील काही वर्षांत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक करण्याचा मानस असून सर्व एसटी बसेस आणि डेपोचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, येत्या दोन महिन्यांत हे काम सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

प्रताप सरनाईक [Pratap Sarnaik] यांच्या हस्ते पुण्यात एसटीच्या अत्याधुनिक स्मार्ट ई-बसचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी देशभरातील अनेक उद्योजक उपस्थित होते. स्वारगेट [Swargate] येथील दुर्दैवी घटनेनंतर प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, अद्ययावत सुविधांनी सुसज्ज स्मार्ट इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. त्यांनी स्वतः एका ई-बसची पाहणी करून त्यातील सुविधांची माहिती घेतली.

या स्मार्ट बसमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि सुरक्षितता यंत्रणा असतील. स्वारगेट [Swargate] येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर, बाहेरील व्यक्ती बसमध्ये सहजपणे प्रवेश करू शकणार नाहीत, अशी मजबूत यंत्रणा बसमध्ये असावी,यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच, आग किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा बसमध्ये असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटी महामंडळाचे आता प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सरनाईक [Sarnaik] यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो परंतु....गोपीचंद पडळकरांचा पलटवार

इलेक्ट्रिक बसेसना प्राधान्य आणि एसटी महामंडळाचे आधुनिकीकरण

एसटी महामंडळाच्या आधुनिकीकरणावर बोलताना मंत्री सरनाईक [Sarnaik] यांनी सांगितले की, वर्षाला ५ हजार नवीन बस घेण्याचे नियोजन असून, त्यापैकी १ हजार बस इलेक्ट्रिक असाव्यात असे माझे मत आहे. पुढील काही वर्षांत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, सर्व एसटी बसेस आणि डेपोचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, येत्या दोन महिन्यांत हे काम सुरू होईल. यात सुरक्षा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. पुढील १० वर्षांत जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने बंद करून नवीन, अधिक सुरक्षित बसेस आणल्या जातील. सध्या २६१० नवीन बसेस रस्त्यावर येणार असून, त्यापैकी १५०० बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. भविष्यात ज्या ठिकाणी बस सेवा नाही, तिथेही पोचण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बसेस लिझवर न देता, काही ठिकाणी त्या तयार करून घेतल्या जातील आणि त्यांची मालकी एसटी महामंडळाकडेच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या २८ वर्षीय दहशदवाद्याला अटक

एसटी महामंडळाच्या तोट्यावर श्वेतपत्रिका काढणार

एसटी महामंडळाला सध्या ११ हजार कोटींचा संचित तोटा असून, यावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे सरनाईक [Sarnaik] यांनी सांगितले. जुन्या चुका सुधारून नव्या पद्धतीने काम सुरू केले जाईल, मात्र या सुधारणा लगेच न होता, पुढील अडीच वर्षांत हळूहळू होतील असे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार [Deputy Chief Minister Ajit Pawar] परिवहन खात्याला सढळ हाताने निधी देत असून, २०२९ पर्यंत २५ हजार नवीन बसेस आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार [Ajit Pawar] जुने सहकारी असल्याने एसटी महामंडळाला त्यांची मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. एचएसआरपी (HSRP) प्लेट्ससाठी [HSRP Plates] ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून, यात कोणी चुकीचे करताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा  जबाबदार नेते इतके पोरकटपणे बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पाहिले - शरद पवार

चौकट

बाळासाहेब ठाकरे [Balasaheb Thackeray] आणि शरद पवार [Sharad Pawar] यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाची प्रशंसा

कौटुंबिक राजकारणावर विचारले असता, सरनाईक [Sarnaik] यांनी पवार कुटुंब [Pawar family] असो किंवा ठाकरे कुटुंब [Thackeray family], यांचा अनेक वर्षांचा राजकीय प्रवास असून त्यांनी जनतेसाठी खूप काम केले आहे, असे सांगितले. बाळासाहेब ठाकरे [Balasaheb Thackeray] आणि शरद पवार [Sharad Pawar] यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. जर कुटुंबातील सदस्य कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर त्यात काही गैर नाही. परंतु दोन राजकीय पक्ष एकत्र येण्यासाठी ते ज्या वैचारिक मुद्द्यावर एकमेकापासून दूर गेले आहेत ते मतभेद त्यांच्यामध्ये मिटणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन सरनाईक [Sarnaik] यांनी केले. नितेश राणे [Nitesh Rane] यांच्या भावनावेगातील वक्तव्यावर त्यांनी कालच्या मंत्रिमंडळात चर्चा होऊन विषय संपल्याचे सांगितले. राज्यात महायुती म्हणून लढण्याचे धोरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love