अखेर एमपीएससीची परीक्षा रद्द: काय झाला निर्णय?


मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उताहत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या भारती बंद कराव्यात अशी मागणी आणि येत्या ११ ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती. त्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. मराठा समाजाचे नेते आणि मराठा संघटना यांनी एमपीएससी परीक्षा रद्द न केल्यास परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा बंद पाडण्याचा इशारा दिला होता.

याबाबतचे वातावरण तापलेले असतानाच काल( गुरुवारी) मराठा समाजाच्या समन्वयकांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन चर्चा केली होती. परंतु, त्यातून काही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख नेत्यांचीमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली आणि अखेर या बैठकीत येत्या ११ ऑक्टोबर रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा  #Devendra Fadnavis : तुतारी कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच - देवेंद्र फडणवीस

या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला असून लवकरच पुन्हा बैठक घेऊन परीक्षेची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगितले. तर ११ ऑक्टोबरच्या परीक्षेला जे विद्यार्थी पात्र होते ते सर्व विद्यार्थी पुढील परीक्षेस पात्र असतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love