डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘मीसुद्धा दाभोळकर’ असे म्हणत शहराच्या मध्यवर्ती भागातून रॅली

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे – आज (20 ऑगस्ट) डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात ज्या ठिकाणी हत्या झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर येऊन 8 व्या स्मृतीदिना निमित्ताने ‘अंनिस’च्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दाभोळकरांना जरी मारले असले तरी त्यांच्या विचारांना कोणीही मारू शकत नाही. डॉक्टरांचे काम अविरत चालू ठेवू अशी घोषणा देत, ‘मीसुद्धा दाभोळकर’ असे म्हणत शहराच्या मध्यवर्ती भागातून रॅली काढण्यात आली.

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्टला गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. या आठ वर्षांमध्ये संशयित मारेकऱ्यांना सीबीआयने अटक केलेली आहे, तसेच कलबुर्गी पानसरे आणि गौरी लंकेश यांच्याही संशयित मारेकऱ्यांना देखील पकडण्यात सीबीआयला यश आले आहे. जरी या सर्व संशयित मारेकऱ्यांना सीबीआयने पकडले असले, तरी या घटनेचा मुख्य सूत्रधार अजून मोकाट आहे. आणि न्यायालयात अजून ही ट्रायल केस उभी राहिलेली नाही. तसेच या खूनामागे जे मुख्य सूत्रधार होते त्यांनाही अजून पकडण्यात यश आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर या सूत्रधारांना पकडण्यात यावे आणि लवकरात लवकर या खूनाची केस कोर्टामध्ये उभी राहावी अशी मागणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगा हमीद दाभोळकर यांनी यावेळी केली.’

खटला लवकर सुरू करावा’दाभोळकरांच्या हत्येला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत. तरी अद्याप सीबीआयने खटला सुरू केलेला नाही. त्यांनी हा खटला लवकरात लवकर सुरू करावा आणि दाभोळकरांची हत्या करणाऱ्या मुख्यसूत्राधारांना शिक्षा करावी अशी मागणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगी मुक्ता दाभोळकर यांनी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *