राज्यात मास्कची सक्ती नाही -राजेश टोपे

पुणे- राज्यातील काही शहरांमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी मास्क (mask )वापरण्याविषयी अपील करण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. व्हीएसआयच्या वतीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय साखर परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, मागच्या काही दिवसांत मुंबई, […]

Read More

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

पुणे- दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या सहाही जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही याचा अहवाल येत्या सात दिवसात येणार आहे. त्यामुळे या सहाही जणांचे अहवाल काय येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी याबाबतची माहिती दिली. या सहाजणांमध्ये […]

Read More

अन्.. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही; निवडून आलेल्या पतीला खांद्यावर घेत काढली गावभर मिरवणूक

पुणे- महाराष्ट्रातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल सोमवारी लागला. निकाल लागल्यानंतर कुठल्या राजकीय पक्षाने बाजी मारली, कुठल्या प्रस्थापितांना धक्का बसला अशा आशयाच्या बातम्या सोशल मिडीया आणि माध्यमांमध्ये झळकल्या परंतु, पुणे जिल्ह्यात एका गावच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या मिरवणुकीची बातमी आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हा विषय सर्वत्र चर्चेचा झाला आहे. एरवी अनेकवेळा निवडून […]

Read More
Fake visa gang jailed)

पुणे व नगर जिह्यात धुमाकूळ घालणारे दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद

पुणे–पुणे व नगर जिह्यात धुमाकूळ घालणाऱया दोन अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात इतर साथीदारांसोबत घरफोडय़ा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय 26 वर्षे रा. निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर) दीपक उर्फ आशिक आझाद […]

Read More

देशातील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

पुणे–महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी छापे घालत देशातील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. हिमाचल प्रदेशातील वेगवेगळय़ा जिल्हय़ांमध्ये ही कारवाई केली गेली आहे. यामध्ये दोघांना ताब्यात घेतले असून, मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे लोहमार्ग पोलिसांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ड्रग्ज पेडलरवर कारवाई करून कोटय़वधी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले होते. त्याअनुषंगाने […]

Read More

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानापोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल- रमेश कुमार

पुणे—औरंगाबाद व पुणे विभागात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे सोयाबीन, उडीद, तूर, कापूस, बाजरी, या पिकांचे आणि पालेभाज्या, फळे यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. याचबरोबर रस्ते, वीज, घरे, यांसारख्या पायाभूत सुविधांवर परिणाम झालेला निदर्शनास आला आहे. झालेल्या नुकसानापोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन आतंर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेश कुमार यांनी दिले. पुणे […]

Read More