अजित पवार यांना कोरोनाची लागण:ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल


पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. उपचारासाठी ते ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.

-अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

असे त्यांनी ट्वीट केले आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून अजित पवार कणकण आल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने अजित पवार घरीच विश्रांती घेत होते. त्याचवेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यांचे पुत्र पार्थ यांनी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळले होते. आज मात्र, अजित पवार यांनीच स्वत: त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळवले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल करा - शरद पवार