पायल घोष करणार आरपीआयमध्ये प्रवेश? का करणार आरपीआयमध्ये प्रवेश?


मुंबई–चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी फिल्म अभिनेत्री पायल घोष आपल्या वकिलांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) मध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता त्याला पुष्टी मिळाली आहे.

पायल घोष हिने अनुराग कश्यपवर ‘मी टू’चा आरोप केला होता. यासंदर्भात तिने मुंबईतील एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कश्यप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कश्यप यांनी पायलचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  

दरम्यान,रामदास आठवले यांनी पायल घोषला  ‘मी टू’ प्रकरणात पाठिंबा दर्शविला होता. त्यांनी तीची भेटही घेतली होती.इतकेच नव्हे तर त्यांनी पायलला बरोबर घेऊन  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. पायलने आपली सुरक्षा आणि न्यायाची मागणी राज्यपालांकडे केली होती.

अधिक वाचा  हा तर महाराष्ट्राचा अपमान -संजय राऊत

रामदास आठवले यांनी पायलला केलेली मदत यावरून गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आरपीआय प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून ती तिच्या वकिलांसह आरपीआयमध्ये प्रवेश करणार आहे. तीची आरपीआयच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी तर तिच्या वकिलांची आरपीआयच्या लॉयर सेलमध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love