#धक्कादायक: १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हि़डीओ सोशल मीडियावर केला व्हायरल

आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड

पुणे(प्रतिनिधि)—इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षिकेनी लाथा बुक्कीने मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या नदीपात्रात १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हि़डीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अन्सू शर्मा (वय १९, रा. मंडई) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात १६ वर्षीय मुलाच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शर्मा आणि तक्रारदार महिलेच्या मुलाचा वाद झाला होता. महिलेच्या मुलाने मारहाण करण्यास काही जणांना पाठविल्याचा शर्मा याचा समज झाला होता. या कारणावरून शर्मा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी १६ वर्षीय मुलाला डेक्कन परिसरातील नदीपात्रात नेले. तेथे त्याला पट्टा आणि बांबूने मारहाण केली. नदीपात्रात त्याला विवस्त्र करण्यात आले.

अधिक वाचा  इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातील एकाला अटक

 मोबाइलद्वारे चित्रीकरण करून समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करण्यात आली. आमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुमच्या समाजाच्या समूहावर चित्रफीत प्रसारित करण्यात येईल, अशी धमकी आरोपींनी दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, डेक्कन पोलीस तपास करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love