Pune International Film Festival  | PIFF : अमिन सयानी, गौतम घोष, लीला गांधी,एम. एम. कीरवानी यांना ‘पीफ’चे पुरस्कार जाहीर

Amin Sayani, Gautam Ghosh, Leela Gandhi, M. M. Keerwani announced piff award
Amin Sayani, Gautam Ghosh, Leela Gandhi, M. M. Keerwani announced piff award

Pune International Film Festival  | PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Pune International Film Festival) (पीफ) (PIFF)  २०२४’चा उद्घाटन सोहळा गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Kreeda Manch) येथे १८ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता होणार असून, यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील(Indian Film Industry ) योगदानाबद्दल प्रसिद्ध रेडीओ उद्घोषक(Radio announcer) अमिन सयानी (Amin Sayani) , दिग्दर्शक-अभिनेते( Director-actor) गौतम घोष(Gautam Ghosh)  आणि प्रसिद्ध नृत्यांगना-अभिनेत्री(Dancer-actress) लीला गांधी(Leela Gandhi)  यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’(PIFF Distinguish Award), तर संगीत संयोजक, गायक आणि गीतकार( Music composer, singer and lyricist )एम. एम. कीरवानी (M. M. Kirwani) यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार (Composer S. D. Burman Award ) देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा, आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल(Dr. Jabbar Patel) यांनी केली. (Amin Sayani, Gautam Ghosh, Leela Gandhi, M. M. Keerwani announced piff award)

अधिक वाचा  जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा : २८ ऑक्टोबरला कॅन्डल मार्च

उद्घाटन सोहळ्यानंतर ‘अ ब्रायटर टुमारो’ (इटली, दिग्दर्शक – नानी मोरेत्ती) (A Brighter Tomorrow)  हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे, तर ‘कीडनॅप्ड’ (इटली, दिग्दर्शक – मार्को बेलोचिओ) या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगित

हे वर्ष सदाबहार अभिनेते देव आनंद (Deo Anand)  (२६ सप्टेंबर १९२३), गायक मुकेश (Mukesh) (२२ जुलै १९२३), दिग्दर्शक मृणाल सेन(Mrunal sen)  (१४ मे १९२३), प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक एनटीआर(NTR) (२८ मे १९२३), संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी(Salil Chaudhari)  (१९ नोव्हेंबर १९२३) आणि गीतकार शैलेन्द्र(Shailendra) (३० ऑगस्ट १९२३) यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असल्याचे  डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.

यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्यूरींच्या नावाचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये पेट्र झेलेन्का – (झेक प्रजासत्ताक – नाटककार आणि दिग्दर्शक), शाई गोल्डमन (इस्रायल – सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माता), सुधीर मिश्रा (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), मंजू बोराह (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक), सेतारेह इस्कंदरी (इराण – अभिनेत्री), उमरान सफ्तेर (तुर्कस्तान – चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता), सू प्राडो (फिलिपाईन्स – अभिनेत्री) आणि विसाकेसा चंद्रसेकरम (श्रीलंका – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, नाटककार) यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) ४ ते ११ मार्च दरम्यान

या महोत्सवात विकास खार्गे, अविनाश ढाकणे, जानू बरुआ, शाई गोल्डमन, मनोज वाजपेयी यांचे विविध विषयांवर मास्टर क्लास होणार आहेत. ‘नव्या मराठी सिनेमाच्या शोधात’ या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यामध्ये निखिल महाजन, वरून नार्वेकर, रितेश देशमुख, मंगेश देसाई आणि संजय कृष्णाजी पाटील सहभागी होणार आहेत. तसेच चित्रपट महोत्सवांचे भविष्य आणि महत्त्व या विषयावरील परिसंवादामध्ये सैबल चटर्जी, बीना पॉल, एडवीनास पुकास्ता सहभागी होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love