तरुणाला नग्न करीत नाचायला भाग पाडून 60 हजार रुपये लुटले : व्हिडिओ केला व्हायरल

दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे- तरूणाला फ्लॅटवर बोलावून घेत टोळक्याने त्याला नग्न करीत नाचायला भाग पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याशिवाय त्याच्याकडील ६० हजार रूपये जबरदस्तीने घेउन लुट केली आहे. नग्न अवस्थेतील नाचतानाचा व्हिडिओ गावातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केल्याची  घटना १३ ते १४ जुलैला येरवड्यातील एकता हौसिंग सोसायटीत घडली आहे. (60 thousand rupees were robbed by forcing the young man to dance naked)

सोमनाथ कोंडींबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले (सर्व रा. तिसगाव प्रवरानगर)यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ आणि चंद्रकांत यांनी फिर्यादी तरूणाला १३ जुलैला फोन केला. तुझा भाउ आला आहे, असे सांगून एकतानगरमधील फ्लॅटमध्ये बोलावले. त्याठिकाणी आरोपींनी तरूणाला कपडे काढून नग्न होउन नाचायला भाग पाडले. त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवून तरूणाकडील ६० हजारांची रोकड काढून घेतली. त्याशिवाय तरूणाचा मोबाइल जाळून टाकला. त्यांच्याकडील तरूणाचा व्हिडिओ गावाकडील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केला. याप्रकरणी फिर्यादी तरूणाने उशिरा तक्रार दिल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  संरक्षण,सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार- भारतीय मजदूर संघ