पुणे—पुण्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र आहे. नवीन रुग्णांबरोबरच मृत्युच्या संख्येतही घट होताना दिसते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी पुणेकरांसाठी हा दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात नवीन ३७१ कोरोनाबाधित रुग्णांचे वाढ झाली तर चार जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक रुग्ण हा पुण्याबाहेरील आहे.
दरम्यान, दिवसभरात ३४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ४०८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात २४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५३९६ ततकी असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १७०३५० इतकी झाली आहे तर ४४६७ एकूण मृत्यू झाले आहेत. आजपर्यंतच एकूण १६०४८७ रुग्णांना बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
पुण्यामध्ये कोरोनाचे संकट दिवाळीअगोदर बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत होता. परंतु, पुन्हा ही संख्या कमी झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.