IISER मधील PhD करणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू, अभाविप करणार आंदोलन

शिक्षण
Spread the love

पुणे- पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था Indian Institute of Science Education and Research (IISER)या संस्थेतील बोरिश सिंग या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असतानाही त्याचा मूळ आजार लक्षात न घेता त्याच्यावर covid-१९ चे उपचार चालूच ठेवले आणि IISER च्या हलगर्जीपणामुळे बोरिशला आपला जीव गमवावा लागला. या हलगर्जीपणामुळे भारताने आपला भविष्यातील एक हुशार वैज्ञानिक गमवलेला आहे आणि याला सर्वस्वी IISER प्रशासन जबाबदार आहे. सरकार करोडो रुपये IISER वर खर्च करत असताना देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कोणतीच काळजी घेताना दिसत नाही असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई  व पीडित कुटुंबाला योग्य तो मोबदला न मिळाल्यास अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला आहे.

अभाविपने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोविड -१९ च्या महामारी मुळे मार्च २०२० मध्ये संपूर्ण देशात त्वरित लॉकडाउन जाहीर केले गेले, बरेच विद्यार्थी असे होते, जे लॉकडाऊनमुळे अडकले होते, अशाच विद्यार्थ्यांपैकी क्षेत्रीमायूम बोरिश सिंग हा ईशान्य भारताच्या मणिपूर राज्यातील असणारा व पुणे या ठिकाणी IISER मध्ये PhD करत होता. या कॉरोनाच्या संकटकाळात कोरोना विषाणूवरील IISER येथील संशोधन प्रयोगशाळेत काम करून त्याने सामाजिक कार्यात हातभार लावायचा निर्णय घेतला परंतु समाजासाठी त्याने केलेल्या नि:स्वार्थ सेवेसाठी बोरिश ला दुर्दैवाने अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागले. २४ ऑक्टोबर रोजी बोरिश आजारी झाला परंतु २ दिवसाच्या नंतर २६ ऑक्टो त्याला विलगिकरण कक्षात ऍडमिट करण्यात आले होते, २८ ऑक्टोबर ला त्याचा COVID-19 रिपोर्ट negative आला त्यापूर्वीच वैद्यकीय विभागाने त्याच्यावरती covid-19 चे उपचार सुरू केले होते, या वेळी त्याच्या पेशी २१००० होत्या तरीदेखील IISER मधील वैद्यकीय विभागाने बोरिश च्या मूळ आजाराला लक्षात न घेता त्याच्यावर covid-१९ चे उपचार चालूच ठेवले आणि IISER च्या हलगर्जीपणामुळे बोरिशला आपला जीव गमवावा लागला. या हलगर्जीपणामुळे भारताने आपला भविष्यातील एक हुशार वैज्ञानिक गमवलेला आहे आणि याला सर्वस्वी IISER प्रशासन जबाबदार आहे. सरकार करोडो रुपये IISER वर खर्च करत असताना देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कोणतीच काळजी घेताना दिसत नाही. या संदर्भात अभाविपने राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय, IISER संचालक डॉ. जयंत उदगावकर यांना पत्र पाठवले आहेत व विद्यार्थ्याच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तरी या संदर्भात आज अभाविप पुण्याच्या वतीने प्रशासनाची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी व विद्यार्थ्याच्या पीडित कुटुंबाला योग्य तो मोबदला मिळावा यासाठी निवेदन देण्यास कार्यकर्ते गेले असता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून अभाविप कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला व कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित निवेदनाची प्रत गेटवर चिटकवून IISER प्रशासनचा निषेध नोंदवला. जर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही केली नाही व पीडित कुटुंबाला योग्य तो मोबदला न मिळाल्यास अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *