पुणे शहरात 766 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ: 231 जण क्रिटीकल


पुणे – पुणे शहरातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे दिसून येत आहे. काल (बुधवारी) पुणे शहरात नवीन 743 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. आज त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. आज दिवसभरात नवीन 766 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात सध्या 231 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आज करोनाबाधीत 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील 3 रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.

पुणे शहरात आजपर्यन्त एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 200462 इतकी झाली असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3930 इतकी आहे. आत्तापर्यंत एकूण 4841 मृत्यू झाले आहेत. आजपर्यंतच एकूण 191691 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज एकूण 6556 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  पुणे जिल्ह्यात ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोना लसीची ‘ड्राय रन’