पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी पुणे दौरा निश्चित: सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन घेणार आढावा


पुणे—कोरोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जगातील विविध कंपन्यांमध्ये कोरोनावरील लस बनविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. भारतातील विशेषत: पुण्यातील सीरम  इन्स्टिट्यूट या कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून त्यांनी चार कोटी डोस तयार केले आहेत. लस तयार झाल्यानंतर तिच्या वितरणासाठी नियोजनाची तयारीही केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: पुण्यातील सीरम  इन्स्टिट्यूटला शनिवारी भेट देऊन सर्व आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरु होती. मात्र, मोदींचा येत्या शनिवारचा दौरा निश्चित झाला आहे. त्यांच्या दौऱ्याची प्रशासनकडून जोरदार तयारी सुरु आहे.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले राष्ट्राला उद्देशून? वाचा संपूर्ण संदेश

दरम्यान, शंभर देशांच्या राजदूत दिनांक २७ नोव्हेंबरला  “सीरम” इन्स्टिट्यूट आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देणार होते परंतु, मोदींच्या दौऱ्यामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला असून आता ते ४ डिसेंबरला सीरम  इन्स्टिट्यूटला भेट  देण्यासाठी  येणार आहेत.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर शनिवार (दि.२८ ) रोजी सीरमला भेट देऊन आढाव घेणार असल्याची माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. गुरूवारी दुपारी १२ वाजता पंतप्रधान कार्यालयाकडून मोदी यांच्या दौऱ्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love