पुणे- महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस कमी होताना दिसते आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभरात नवीन २८४ कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाली आहे तर ३२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५६०५ इतकी असून दिवसभरात २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ रुग्ण पुण्याबाहेरील आहे.
महाराष्ट्रात पुण्यामध्ये कोरोनाने सर्वात जास्त थैमान घातले होते. मध्यंतरी कोरोनाबाधित रुग्णांना खाटा न मिळणे, उपचार न मिळणे, इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनचा, व्हेंटीलेटरचा तुडवडा अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने या सर्व व्यवस्थेवरचा ताणही कमी झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. विशेष म्हणजे नवीन कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येपेक्षा बरे होऊन घरी जाणार्या रुग्णांचे संख्या जास्त आहे.
सध्या, ५८४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात ३३३ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १६०९६१ इतकी झाली असून आजपर्यंत एकूण १५११४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ४२११ मृत्यू झाले आहेत.आज २९७० जणांच्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.