पुण्यात ५१ टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचे कळलेच नाही?


पुणे(प्रतिनिधी)—राज्यात कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट शहर म्हणून गणल्या गेलेल्या पुण्यामध्ये एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या वतीने करण्यात आलेल्या ‘सिरो सर्व्हे’ करण्यात आला. त्यामध्ये ५१ टक्के पुणेकरांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँँटिबॉडी विकसित झाल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी ही माहिती दिली.या संस्थांनी २० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत हा सर्व्हे केला. त्यामध्ये त्यांना ५१ टक्के पुणेकरांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅँटिबॉडी विकसित झाल्या असल्याचे दिसून आले आहे.

सर्वेक्षणासाठी  पुण्यातील येरवडा, कसबा पेठ-विश्रामबाग, रास्ता पेठ-रविवार पेठ, लोहिया नगर-कासेवाडी, नवीपेठ-पर्वती या भागातील १ हजार ६६४ नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. सर्वेक्षणातील निष्कर्षांमध्ये या भागांमधील ५१.०५ नागरिकांमधे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत.कोरोनाची बाधा होण्यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव दिसून येत नाही. ५२.८ पुरुषांना, तर ५०.१ महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६६ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांमधे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ३२.६ टक्के आहे, तर सर्वाधिक प्रमाण हे ५१ ते ६५ वयोगटातील लोकांमधे आहे, जे ५० टक्के इतके आहे. कोरोनाचा सर्वाधिक ५६ टक्के ते ६२ टक्के फैलाव हा चाळीत किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव सर्वाधिक आहे. सर्वेक्षणातील निष्कर्षांमध्ये या भागांमधील ५१.०५ नागरिकांमधे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत.

अधिक वाचा  अदाणीचे वीज दर निवासी आणि सर्व व्यावसायिक-औद्योगिक ग्राहकांसाठी स्पर्धात्मकच

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पाच प्रभागांतील नागरिकांच्या शरीरातील अँँटिबॉडीची तपासणी करण्यात आली. त्यासाठी त्यांच्या रक्ताची तपासणी केली गेली.  सर्व्हेनुसार या प्रभागांतील ५१ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅँटिबॉडी तयार झाल्या आहेत. याचा अर्थ त्यांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झाली असून, त्यांनी त्यावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु म्हणून त्यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणार नाही असे म्हणता येणार नाही.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love