चक्क खोडरबरमध्ये लपवून आणले सोने: आठ लाख रुपये किमतीचे सोने जप्त

क्राईम
Spread the love

पुणे- दुबईहून पुण्यामध्ये आलेल्या प्रवाशाकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावर १५१.८२ ग्रॅम सोने जप्त केले आहे. जप्त केलेले सोने २४ कॅरेटचे असून त्याची बाजारातील किंमत 7 लाख 89 हजार रुपये इतकी आहे. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे हे सोने चक्क खोड रबरामध्ये लपवून आणले होते.

पुणे विअमन्तलवर येणाऱ्या प्रवाशांची नेहेमी प्रमाणे तपासणी करण्यात येत असताना हे सोने एका प्रवाशाकडे आढळून आले. या प्रवाशाने हे सोने मोठ्या खोड रबरामध्ये लपवून ट्रॉली बॅगच्या हँडलमध्ये लपविले होते. तसेच आणखी एक खोड रबर चॉकलेट बारमध्ये लपवण्यात आले होते. कस्टम विभागाने या सर्व वस्तू जप्त केल्या आणि त्यांची तपासणी केली असता ही तस्करी उघडकीस आली. कस्टम विभागाने हे सर्व सोने जप्त केले असून पुढील कारवाई केली जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *