मुंबईच्या व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे अपहरण: ३५ लाख रुपये खंडणीची मागणी


पुणे—पिंपरी-चिंचवड येथे आपल्या मुंबईतील एका व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे अपहरण केल्याचे घटना उघडकीस आली आहे. आठ जणांनी व्यापाऱ्याकडे ३५ लाखांची खंडणी मागत मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर पोलिसांकडे  तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तीन जण मात्र फरार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी आणि त्यांचा 27 वर्षीय मॅनेजर हे शहरातील आकुर्डी येथील सिल्व्हर सेव्हन हॉटेलमध्ये कामानिमीत्त आले होते. दरम्यान, शनिवारी मॅनेजर हा गुंतवणुकीसाठी एका व्यक्तीकडून 5 लाख रुपये आणण्यासाठी गेला असता त्याचे आठ जणांच्या टोळक्याने 35 लाखांसाठी अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी या मॅनेजरला विविध ठिकाणी नेऊन व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केली. मॅनेजरला सोडवायचे असल्यास 35 लाख रुपये दे, अन्यथा त्याला जीवे मारून टाकू अशी धमकी आरोपींनी व्यापाऱ्याला दिली. दोन दिवस मॅनेजर हा आरोपींच्या तावडीत होता.

अधिक वाचा  भल्या पहाटे अजित दादांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी

आरोपींचा पैशांसाठी वारंवार फोन येत असल्याने 43 वर्षीय व्यापाऱ्याने अखेर निगडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर, रात्री उशिरा आरोपींंना पैसे घेण्यासाठी हॉटेल सिल्व्हर सेव्हनच्या परिसरात बोलावून काही आरोपींना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. आपले साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच इतर तीन जणांनी अपहरण झालेल्या मॅनेजरला डांगे चौकात सोडून ते फरार झाले.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love