कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या : याने केली मोहोळची हत्या

1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held
1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held

Gangster Sharad Mohol murder : पुण्यातील (Pune) गॅंगवॉरने (Gangwar) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील (Kothrud) सुतारदरा(Sutardara) परिसरात दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Gnagstar Sharad Mohol) याच्यावर गोळीबार(firing ) करण्यात आला. गोळीबारात मोहोळला तीन गोळ्या लागल्या. त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुंड शरद मोहोळ(Sharad Mohol) याच्यावर झालेला हा जीवघेणा कुणा केला ? हा हल्ला एखाद्या टोळीने अथवा पूर्ववैमन्यस्यातून झाला का? याची अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलिसांनी दिली. (Gangster Sharad Mohol shot dead)

आज शरद मोहोळ याच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता. तो कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. पूर्ववैमन्यास्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोळीबार झाल्यानंतर कोथरुड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते.

अधिक वाचा  चार दहशतवाद्यांच्या चौकशीत देशभरातील बॉम्बस्फोटाचा कट उघडकीस

शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या(Murder), हत्येचा प्रयत्न(attempted murder), खंडणी(extortion,), अपहरण ( kidnapping) यासारखे गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी (Pintu Marane Murder Case) मोहोळला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता. पण दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले (Shankar Dhindle) यांचे अपहरण (Kidnapping) केल्याप्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे. जुलै २०२२ मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयानं मोहोळची निर्दोष मुक्तता केली आहे. मोहोळ यानं त्याच्या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमदेखील घेतले होते. गुन्हेगारीतून थेट सामाजिक कार्याकडं मोहोळ वळल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

अधिक वाचा  सामूहिक नमाज पठण करू नये यासाठी पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे 'फेसबुक लाईव्ह

दरम्यान, पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा भाजपा नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहळचा (Swati Mohol) एप्रिल २०२३  मध्ये भाजपात प्रवेश झाला होता. त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी पक्षातील जबाबदारी व दिलेलं काम प्रामाणिकपणे करणार असल्याचं म्हटलं होतं. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला होता. दुसरीकडं गुंड गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या पत्नीला भाजपामध्ये प्रवेश मिळाल्यानं भाजपावर टीका झाली होती.

दरम्यान, गुंड शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्या ३  आरोपींपैकी एका आरोपीचे नाव संध्याकाळी निष्पन्न झाले आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे आरोपीचे नाव आहे.

एकेकाळी पुण्यात मोहोळ गँगची दहशत होती. मोहोळ गॅंगचे सगळे काम शरद मोहोळ काम करत असल्याची चर्चा होती. विविध गुन्ह्यांमध्ये तसंच तडीपारच्या प्रकरणात शरद मोहोळला अनेक वेळा तुरुंगात जावे लागले होते. येरवडा कारागृहामध्ये देशद्रोहाचा आरोप असलेल्या कैद्याला शरद मोहोळनं मारल्याची घटना घडली होती. तेव्हापासून त्याची कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख निर्माण झाली. याचाच फायदा भाजपाने घेण्यासाठी त्याची पत्नी स्वाती मोहोळला पक्षात एप्रिल 2023 मध्ये प्रवेश दिला. पुण्यात हिंदू आक्रोश मोर्चाचे नेतृत्वही शरद मोहोळनं केलं होतं. कसबा पोट निवडणुकीमध्ये शरद मोहोळ थेट भाजपाच्या प्रचाराकरिता मैदानात उतरला होता.

अधिक वाचा  तालायनतर्फे पं. किशन महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव: वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल

या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही

कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love