पुणे-पुणे येथील पर्वती मतदार संघाच्या भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील घरातून १८ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी गेले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ममता दीपक मिसाळ यांनी वानेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील फेअर रोड येथे फिर्यादी ममता मिसाळ, पती दीपक, मुले आणि जावू माधुरी मिसाळ एकत्रित राहतात. २८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या एका नातेवाईकांच्या समारंभा करिता त्यांना जायचे होते. त्यावेळी बेड रूममध्ये ठेवलेले दागिने त्यांनी पाहिले. मात्र त्यामध्ये हिरे मोत्यांचा हार आणि कडा सापडला नाही. त्यानंतर सर्व ठिकाणी शोधाशोध केली. तरीही दागिने सापडले नाहीत. त्यामुळे अखेर त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली असून या चोरीच्या घटनेचा तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले.