सिगारेट न पिल्यास जीवे मारण्याची रूममेटची धमकी: तरुणाची आत्महत्या

क्राईम
Spread the love

पुणे –खोलीत एकत्र राहणाऱ्या सहकार्याने( रूममेट) सिगारेट ओढण्यासाठी जबरदस्ती केल्याने आणि न पील्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कर्वेनगर भागातील गुरुदत् सोसायटीच्या परिसरात ही घटना घडली. सागर अशोक पवार(वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव असून मूळचा जळगावचा आहे.

दीपक याने या प्रकरणी पोलिसानी लक्ष्मण वासुदेव पाटील (वय ३०, गुरुदत्त कॉलनी) याला पोलिसानी अटक केली आहे.दीपक पवार यांनी यासंदर्भातली फिर्याद वारजे पोलीस ठाण्यात केली होती.

सागर पवारने त्याचे बारावीचे वर्ष नुकतेच पूर्ण केले होते. तो अनाथ असल्याने आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. शिक्षणानंतर मार्केटिंग क्षेत्रातील एका खासगी कंपनीत सागर कामालाही लागला होता. तीन दिवसांपूर्वी तो कर्वे नगर येथील गुरुदत्त कॉलनीत राहण्यास आला होता. लक्ष्मण पाटील हा त्याचा रुममेट होता. लक्ष्मणने सागरला खोलीत आल्या दिवसापासून सिगारेट ओढण्याची सक्ती करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने सागरच्या मागे तगादाच लावला. खरंतर सागरने लक्ष्मणला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला होता. मात्र लक्ष्मण ऐकतच नव्हता तू सिगारेट ओढ नाहीतर तुला ठार करेन अशी धमकीही लक्ष्मणने सागरला दिली. या सगळ्याचा ताण असह्य झाल्याने सागरने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *