माऊली, तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन..

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे

पुणे(प्रतिनिधी)–संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात पुण्यनगरीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सहा वाजून पाच मिनिटांच्या सुमारास शहरात दाखल झाला. दोन्ही पालख्यांचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा बुधवारी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम होता. पिंपरी-चिंचवडकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला  तुकोबांचा पालखी सोहळा सकाळी पुण्याच्या दिशेने निघाला.  विठ्ठल नामाचा रे टाहो… असा प्रेमभाव बाळगत वारकरी पंढरीची वाट चालू लागले. वाकडेवाडी चौकात पालखी आल्यानंतर वारकऱ्यांचा उत्साह अधिकच वाढला. सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी पाटील इस्टेट चौकात दाखल झाली. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी पालखीचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.   महापालिकेच्या वतीने यावेळी पालखीचे व सोहळा प्रमुखांचे पुण्यात आले. त्यानंतर संचेती चौक,  तुकाराम पादुका चौक, फर्ग्युसन रस्ता मार्गे पालखी पुण्यनगरीत दाखल झाली. सायंकाळी पालखी सोहळा निवडुंग्या विठोबा मंदिरात विसावला. पालखीच्या आगमनाने पुणेकर भाविक आनंदून गेले.

अधिक वाचा  लाॅकडाऊनमधून शनिवार वगळा - खा. गिरीश बापट

तुकोबांच्या पालखी सोहळ्या पाठोपाठ माऊलींचा पालखी सोहळा संगमवाडी मार्गे पुण्याच्या दिशेने येऊ लागला. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सोहळ्याचा चौघडा पाटील इस्टेट चौक येथे दाखल झाला. त्यानंतर एकेक दिंड्या पुढे सरकू लागल्या. सायंकाळी  सहा वाजून पाच मिनिटांनी माऊलींची पालखी आली आणि सर्वांच्या नजरेचे पारणे फेडले गेले.

संचेती चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे सोहळा पालखी विठोबा मंदिरात विसावला. दोन्ही पालख्यांच्या आगमनाने पुण्यातील वातावरण भक्तिमय होऊन गेले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love