भक्तीच्या कल्लोळात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे-टाळ मृदंगाचा अखंड गजर…भगव्या पताकांची फडफड…विणेचा झंकार…ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष…अन् मागील दोन वर्षे विठ्ठल दर्शनापासून अंतरल्याने विठुरायाच्या भेटीची लागलेली आस…अशा भक्तीच्या कल्लोळात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सोमवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.  धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव |  तेथे नांदे देव | पांडुरंग ।।  अशा शब्दांत ज्या देहूचे माहात्म्य वर्णिले […]

Read More

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे २१ जूनला पंढरीकडे प्रस्थान

पुणे–देहू संस्थानने आषाढी वारीची घोषणा केली आहे. यानुसार संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहचणार असून १० जुलैला आषाढी एकादशी आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे. […]

Read More

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उद्या तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी प्रस्थान : कसा असणार पालखी सोहळा?

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी वारी सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे पार पडणार आहे. उद्या ( गुरुवार दि. 1 जुलै ) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तर शुक्रवारी(दि. 2 जुलै) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी […]

Read More