introducing Arya in Sony Entertainment Television's 'Dabangi – Mulgi Ai Re Ai'

चुणचुणीत आणि निडर – आर्याचा परिचय करून देत आहे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ‘दबंगी – ‘मुलगी आई रे आई’ मध्ये

पुणे-मुंबई मनोरंजन
Spread the love

मुंबई- विविध पार्श्वभूमीतून आलेल्या अविस्मरणीय पात्रांच्या कथा सादर करण्यात नेहमी आघाडीवर असणारी  सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी ‘दबंगी – मुलगी आई रे आई’ या आपल्या मालिकेतून एका आर्या नामक चुणचुणीत आणि निडर मुलीचा परिचय प्रेक्षकांना करून देणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होत असलेली ही मनोरंजक मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता प्रसारित होणार आहे.

आपल्या वडीलांना भेटण्यासाठी आसूसलेल्या, त्यांचा शोध घेणाऱ्या एका मुलीची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवले. या शोधात तिला अनेक रहस्ये उलगडतील आणि एकमेकांत गुंतलेल्या नात्यांचा शोध लागेल, ज्याने छोट्या आर्याच्या विश्वात मोठी उलथापालथ होईल.

माही भद्रा, सई देवधर, आमीर दलवी आणि मानव गोहिल यांसारखे सुपरिचित कलाकार या मालिकेतील व्यक्तिरेखा जिवंत करणार आहेत. त्यांच्या अभिनयातून मानवी भावनांचे विविध पदर उलगडत जातील आणि त्यांच्या मनातील सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील चिरंतन लढ्याचे दर्शन घडेल. बाल कलाकार माही भद्रा आर्याची भूमिका करत आहे. आर्याचा समज आहे की, तिचे वडील सुपरकॉप आहेत आणि एका मिशनवर गेले आहेत त्यामुळे तिची त्यांच्याशी भेट झालेली नाही पण तिला आपल्या घराण्याचे सत्य माहीत नाहीये. तिची आई छाया (सई देवधर) हिने आर्यापासून हे सत्य लपवून ठेवले आहे की, ती ‘सत्या’(आमीर दलवी)ची मुलगी आहे, जो कुणी सुपरकॉप नाही, तर एक दादागिरी करणारा गुंड आहे. मानव गोहिल सीनियर इन्स्पेक्टर अंकुश राजवाडकरची भूमिका करत आहे, जो सत्याचा भाऊ आहे आणि त्याच्याही नकळत, आर्याने आपल्या पित्याची जी प्रतिमा मनात जोपासली आहे, तसाच तो आहे. या सगळ्यांची आयुष्ये एकमेकांत कशी गुंतली आहेत याचा शोध घेणे प्रेक्षकांसाठी मनोरंजक असेल.

दबंगी – मुलगी आई रे आई ही दोन विरुद्ध विचारसरणींची एक आगळीवेगळी गोष्ट आहे. या विचारसरणींचे मुख्य प्रतिनिधी आहेत, सत्या आणि अंकुश हे दोन भाऊ. यापैकी सत्याला नैतिकतेची चाड नाही, तर अंकुश नीती मूल्यांची जोपासना करणारा आहे आणि या दोघांच्या दरम्यान आहे, आर्या.

बघायला विसरू नका ‘दबंगी – मुलगी आई रे आई’चा प्रीमियर 30 ऑक्टोबर 2023 रोजी आणि त्यानंतर ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता प्रसारित होणार आहे फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

माही भद्रा, बाल कलाकार

“आर्या शूर आहे. तिला नेहमी चांगले काम करायचे असते, पण मला सगळ्यात आवडते ती तिची दबंगी वृत्ती. मी साकारत असलेल्या आर्या या पात्राप्रमाणेच मलाही दबंगी व्हायला आवडेल.”

सई देवधर, अभिनेत्री

“आपल्या मुलीविषयी छायाची जी समर्पण वृत्ती आहे, त्याने मी तत्काळ या व्यक्तिरेखेकडे आकर्षित झाले, कारण ही वृत्ती व्यक्तिशः माझ्यासारखीच आहे. या माय-लेकीत जे अतूट नाते आहे, ते सगळ्याच मातांना आपलेसे वाटेल. दबंगी – मुलगी आई रे आई या मालिकेतून एका आईला आपल्या मुलांविषयी वाटणारे प्रेम आणि मुलांची स्वप्ने आणि त्यांची निरागसता जपण्यासाठी त्या काय काय करू शकतात हे दाखवले आहे.”

आमीर दलवी, अभिनेता

“सत्या असा माणूस आहे जो स्वतःच्या नियमांनी जगतो. त्यासाठी आपल्या कुटुंबावर पाणी सोडणे देखील त्याला मान्य आहे. आपल्या वागण्यातून तो नैतिकतेच्या सीमा नेहमी झुगारत असतो. त्याच्या स्वार्थातून आणि आकांक्षांमधून त्याची मानसिकता तयार झाली आहे. या व्यक्तिरेखेचे पदर उलगडणे आव्हानात्मक आहे. दबंगी – मुलगी आई रे आई या मालिकेत हे नकारात्मक पात्र सजीव करण्यास मी उत्सुक आहे.”

मानव गोहिल, अभिनेता

“दबंगी – मुलगी आई रे आई मालिकेत सत्य आणि असत्यातील संघर्ष दाखवला आहे. सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी माणसाला किती त्याग करायला लागतो हे देखील या मालिकेत दाखवले आहे. मी या मालिकेत साकारत असलेला अंकुश एक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस आहे. न्यायाच्या लढ्यासाठी तो आपल्या भावाच्या विरोधात उभा राहायला देखील तयार आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून ज्या भावना व्यक्त करणे अपेक्षित आहे, ते एक अभिनेता म्हणून मला प्रेरणा देणारे आहे. आणि अंकुशच्या निमित्ताने अखेरीस मला एका गणवेशधारी पोलीसाची भूमिका करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खुश आहे.”

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *