पुणे–मराठा आरक्षण हा विषय गुंतागुंतीचा करू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील पुढाऱ्यांना केलं आहे. ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करू नका जरी महाराष्ट्रात मराठा समाज 16 टक्के असला तरी देशात फक्त दोन टक्के आहे हे मराठा समाजाने लक्षात घेतल पाहिजे तर देशभरात ओबीसी समाज एकत्र आला तर मराठा समाजाला महाराष्ट्रात आरक्षण मिळणार आहे तेही मिळणार नाही,असं मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात असला तरी यावर योग्य निर्णय येईल, त्यामुळे यात कुणी खोडा घालू नये असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाला केले आहे.
पुण्यामध्ये आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आणि सुरु असलेले आंदोलन याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायचं असेल तर ते मिळालं पाहिजे. परंतु, आमच्या ताटातलं त्यांना देऊ नये अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. आमच्या ताटातलं आम्हालाच राहू द्या आम्हाला त्यात वाटणी नको अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या पुढार्यांनी हा विषय अधिक गुंतागुंतीचा करू नये. त्यांनी ओबीसींच्यामध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये.
मराठा समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. तो १६ टक्के महाराष्ट्रात असला तरी देशामध्ये तो फक्त २ टक्के होतो हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. देशभरातील ओबीसे एकत्र आले तर जे मराठा समाजाला महाराष्ट्रापुरत मिळणार आहे तेहे मिळणार नाही असे ते म्हणाले.
दरम्यान, सर्वोच्च नायाल्याने जो स्थगिती आदेश दिला आहे त्याला घाबरून जाऊ नका. याप्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होईल
त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात असला तरी यावर योग्य निर्णय येईल, त्यामुळे यात कुणी खोडा घालू नये असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाला केले आहे.