Maratha Reservation

#Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागते, हे सरकारचे पाप आहे.

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Nana Patole| Manoj Jarange –मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करावे लागते, हे सरकारचे पाप आहे. राज्य सरकारला (State Reservation)आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असे विरोधात असताना देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) सांगत होते. मात्र आता त्यांची असताना ते मराठा समाजाला(Maratha Community) आरक्षण का देत नाहीत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले(Nana Patole) यांनी मंगळवारी येथे उपस्थित केला. सरकारने हा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले.

पक्षाच्या लोकसभा निवडणूकपूर्व बैठकीसाठी पुण्यात आलेल्या पटोले यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, आमदार बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकर, डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते. 

पटोले म्हणाले, जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईत पोहोचले, तर कोंडी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे हा प्रश्न सरकारने तातडीने सोडविणे आवश्यक आहे. मराठा-ओबीसी वाद हा आत्ताच्या सरकारचे पाप आहे. राज्यातील सरकारकडे आता पाशवी बहुमत आहे. ते निवडणूकीतून मिळवलेले नाही. कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. इडीच्या धमक्या देऊन तयार झालेले सरकार आहे. राज्य सरकारकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तर मग आरक्षणाचा निर्णय का घेत नाही, ते जनतेला सांगा. शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीच तुलना होऊच शकत नाही. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेचेच राजेच राहणार. त्यामुळे कोणी कुणाची त्यांच्याबरोबर तुलना करत असेल, तर ते अयोग्य आहे. 

 अहवाल आल्यानंतरच उमेदवाराची घोषणा करणार

पुणे लोकसभेसाठी इच्छुकांकडून नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर या नावांबाबतचा सर्वेक्षण सुरू झाले आहे. ही प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे धंगेकर लोकसभेसाठीचे उमेदवार असतील का, अशी विचारणा केल्यावर उमेदवारांच्या नावाबाबत पक्ष पातळीवर सर्वेक्षण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पातळीवर उमेदवारांबाबतचे सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदेश पातळीवरीही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वेक्षण पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. त्याचा अहवाल तयार करण्यात आल्यानंतर सक्षम उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली. 

 पृथ्वीराज चव्हाणांनी हात जोडले

 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारा व अन्य कुठून तरी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत रमेश चेन्नीथला यांना प्रश्न विचारताच, ते म्हणाले, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. चेन्नीथला यांनी असे म्हणताच त्यांच्या बाजूला बसलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट हातच जोडले. राज्याच्या कोणत्याही भागातून पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीसाठी उभे राहिल्यास ते निवडून येतील, असा विश्वासदेखील चेन्नीथला यांनी या वेळी व्यक्त केला.

 महाराष्ट्रात भरीव यश मिळेल : चेन्नीथला यांचा विश्वास 

 सध्याचे केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात असून महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलत नाही. पण आम्ही इंडिया आघाडी देशभरात सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असून लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश निश्चित मिळणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढविणार याबाबत सर्व पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा सुरू आहेत. त्यासंदर्भात येत्या काळात लवकरच घोषणा केली जाईल. तसेच महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व 48 जागा निवडून येतील. सध्याचे राज्य सरकार हे जनतेने निवडून दिलेले नाही. ते ईडी आणि सीबीआयचे सरकार असल्याचे सांगत चेन्नीथला यांनी भाजपवर निशाणा साधला.

 वंचितला सोबत घेण्यास सहमती 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासंदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. याला काँग्रेस पक्षाची सहमती असून, लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *