तब्बल १८ गावठी पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे जप्त :सहा सराईतांना अटक


पिस्तुले सोबत बाळगून शहरात फिरणाऱ्या सहा सराईतांना हडपसर पोलिसानी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १८ गावठी पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही पिस्तुले त्यांनी विक्री साठी आणली असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे.

अरबाज रशीद खान (वय २१), कुणाल नामदेव शेजवळ उर्फ यश (वय १९ ), जयेश राजू गायकवाड उर्फ जय (वय २३), शरद बन्सी मल्लव (वय २१, चौघे रा. शिरूर, जि. पुणे) सुरज रमेश चिंचणे उर्फ गुळ्या (वय २२, रा. गंगानगर फुरसुंगी), विकास भगत तौर उर्फ महाराज (वय २८, रा. लक्ष्मी नगर ,येरवडा ) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

अधिक वाचा  चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाख खंडणीची मागणी: महिला शिक्षिकेसह तिघांना अटक

हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील कानिफनाथ वस्ती, फुरसुंगी  ५-६ युवक उभे असून सर्वांच्याच कमरेला पिस्तुल असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचारी नितीन मुंढे याना बतमीदारकडून मिळाली त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक सौरभ माने, कर्मचारी युसूफ पठाण, राजेश नवले, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, अकबर शेख , शाहिद शेख, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सहा आरोपींना ताब्यात घेतले आणि तपास केला असता त्यांच्याकडे १८ गावठी बनावटीचे पिस्तुले आणि २७ काडतुसे तसेच चोरीची दुचाकी असा ५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केला. त्यांच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  रस्त्यावर झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण

जप्त केलेले पिस्तुले हे देशी बनवटीचे आहेत. आरोपीनी ते मध्यप्रदेश राज्यातून विकत आणल्याची माहिती दिली आहे. तसेच ते पिस्तुले ते पुण्यात आणि ग्रामीण भागात गुन्हेगारांना विक्री करणार होते असेही त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी मुळापर्यंत जाऊन तपास केला जाणार असल्याचे हडपसर पोलिसानी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love