हे सरकार अहंकारी :नियोजन करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी


कंगणाचीही चौकशी करा

पुणे— पुणे हे सांस्कृतिक वैभव असलेले शहर आहे. मात्र, आज कोरोना संसर्गात पुणे एक नंबरवर असणे क्लेशदायी आहे. हे सरकार अहंकारी आहे. (This government is arrogant) त्यामुळे उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही केलेल्या सूचनांचे स्वागत होत नाही. औषधांची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी दाखवल्या, तर सरकार त्या स्वीकारण्यापेक्षा रेटून नेण्याचे काम सरकार करतेय. नियोजन करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,(The government completely fails in planning)असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin Darekar)ज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केला

पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा समाजाची दिशाभूल

Misleading the Maratha community

आर्थिक मागास वर्गात त्यांचा आधीच समावेश होणार होता. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याने त्यांना आर्थिक मागास वर्गात अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन म्हणजे दिशाभूल आहे. मराठा समाजासाठी चारशे कोटीची स्वंतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे. ‘सारथी’ला सक्षम करण्याची गरज आहे. मराठा समाजाला चांगले पॅकेज देण्याची गरज असतानाही केवळ मलमपट्टी करण्याचे काम सुरु आहे. ओबीसींचे आरक्षण आम्हाला नको. फडणवीस यांनी दिलेले स्वतंत्र आरक्षण आम्हाला हवे. सगळ्यांना सामान न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे.

अधिक वाचा  तर...राज्यात जातीनिहाय जनगणना करून टाका- छगन भुजबळ

 कंगनाचीही चौकशी व्हावी Kangana should also be questioned

कंगना रानौत ड्रगिस्ट असल्याचे बोलले जात असेल, तर तिचीही चौकशी झाली पाहिजे. आपल्या वैभवशाली चित्रपट सृष्टीत नवोदीत कलाकार येणार असतील व त्यांना ड्रग्जचे व्यसन जडणार असल्याची शक्यता असल्यास कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही. ड्रग्जचे व्यसन हे फिल्म इंडस्ट्रीच्या हिताचे नाही. केवळ फिल्म इंडस्ट्री नाही तर आपल्या देशात अशाप्रकारे अंमली पदार्थाचा विळखा होता कामानये, कुणीही असो अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवरून राजकारण करण्याची आवश्यकता आहे का? जर ड्रग्ज घेत असतील एनसीबीने चौकशीला बोलावले तर कुणाच्या पोटात का कशासाठी दुखायला पाहिजे? कंगना जर ड्रग्ज घेत असेल, ड्रगिस्ट असेल तर तिचा संबंधित व्हिडिओची सत्यता पडताळून तिची चौकशी व्हावी. कंगना थोडी या देशाची वेगळी नागरिक आहे, सगळ्यांना न्याय तोच कंगनाला न्याय. कायदा हा आपल्या देशात सर्वांना सारखा आहे.” असेही दरेकर म्हणाले.

अधिक वाचा  #दिलासादायक ..पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

सेनेने मुंबईची तुंबई केली

आम्ही करुन दाखवलं’ अशा आशयाची मोठमोठी होर्डिंग्स शिवसेनेनी लावली. या होर्डिंग्जप्रमाणे त्यांनी खरोखरच करुन दाखवले आणि मुंबईची तुंबई झाली. आता याची जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी. पाऊस हा अचानक येतो का? पावसाळा संपल्यानंतर सात-आठ महिने आपल्या हातात असतात. कुठल्या ठिकाणी पाणी तुंबतेय, त्याचा आढावा घेऊन काम करणे जरुरीचे आहे. आपल्याकडे पैशांची कमी नाही, मुबंईसाठी पाहिजे ती मशिनरी आपण घेऊ शकतो. असे असतानाही मुंबईकर प्रत्येक वर्षी पाण्यात जाणार असतील तर तीस-चाळीस वर्षे पालिकेत तुम्ही सत्ता उपभोगून काय केले, हा प्रश्न पडतो. तुंबणारे पाणी  समुद्रात सोडण्याचे नियोजन केले, तर ही परिस्थिती उद्भवणार नाही. मात्र, सेनेला मुंबईकरांच्या मूळ प्रश्नांकडे बघायला वेळ नाही, अशी टीका दरेकर यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love