अजितदादांसोबतचे आमदार आमच्या संपर्कात – जयंत पाटील यांचा दावा

अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपाची विश्वासार्हता संपली
अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपाची विश्वासार्हता संपली

पुणे(प्रतिनिधि)— अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांशी माझी चर्चा झाली असून, केवळ दबावामुळे त्यांनी तिकडे जाण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, मनाने ते पवारसाहेबांसोबतच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे केला. 

 पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेत त्यांनी मला आपली भूमिका सांगितली आहे. आम्ही मनाने शरद पवारांसोबत आहोत. आता थोडा दबाव आहे म्हणून आम्ही इकडे आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दिसते, तसे नसते. खरी परिस्थिती वेगळी आहे. ते लोक आमच्यासोबतच आहेत. वेळ आली, की सगळे कळेल. 

अधिक वाचा  सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !

 आगामी निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, आगामी निवडणुकीत काय होणार, हे लहान मूलही सांगेल. राज्यात शरद पवार यांचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार, ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. या सरकारचा फक्त सहा महिन्याचा खेळ उरला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर परिस्थिती बदलणार आहे. देशात महागाई, बेरोजगारीसारखे मुद्दे आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही. मणिपूर हिंसाचारावर ही मंडळी बोलत नाहीत. या सगळय़ा प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मोठय़ा पक्षांना तोडण्याचे काम सध्या केले जात आहे. 

 महाराष्ट्रातील जनतेने भाजपाला हटविण्याचा संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आमच्यावर आरोप केले. मात्र, आता आमचा पक्ष फोडून आमच्या लोकांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतले. परंतु, जनता आमच्यासोबत आहे. शरद पवारांच्या बाजूने महाराष्ट्रातील 80 टक्के लोकांनी ऍफिडेव्हिट दिले आहे. 24 राज्यात आमचे संघटन आहे. पक्ष आमचा आहे, असे सांगत आमदाराच्या पाठीमागे पक्ष जाऊ शकत नाही, पक्ष हा आपल्या जागेवरच असणार आहे. निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीत योग्य निर्णय होईल, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. 

अधिक वाचा  हे सरकार कोडगं : संभाजीराजे यांच्या राजीनाम्याने कोणावर परिणाम होणार? -चंद्रकांत पाटील

 जातिनिहाय जनगणना संपूर्ण देशात हवी 

 आजमितीला जातीनिहाय जनगणना हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बिहारने याची अंमलबजावणी केली. आता हे संपूर्ण देशात होणे गरजचे आहे. त्यामुळे मागास जातींना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रियाही पाटील यांनी व्यक्त केली. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love