पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड


पुणे –राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर दीपक मानकर (Deepak Mankar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (ncp) पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून मानकर यांनी मुंबई येथे निवडीचे पत्र स्विकारले. (Deepak Mankar elected as President of Pune City Nationalist Congress Party)

पुणे शहर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून अजित पवार यांच्या नेतृत्त्वात मोठे संघटन शहरात आहे. याच संघटननाला मानकर यांचे नेतृत्च मिळाले आहे. मानकर यांनी शहराच्या उपमहापौरपदाची जबाबदारी निभावली आहे. त्यामुळे पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात मानकर यांची प्रभावी यंत्रणा असून याचा पक्ष संघटनेला मोठा फायदा होऊ शकेल. निवडीचे पत्र देत उपमुख्यमंत्री पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मानकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  नाही म्हणजे नाहीच; उगाच संभ्रम नको - शरद पवार

पूर्ण क्षमतेने संघटना मजबूत करणार : दीपक मानकर

‘राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातील पाया भक्कम आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खंबीर नेतृत्वात आणि मार्गदर्शनात संपूर्ण शहर पिंजून काढून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. पुणेकरांच्या प्रश्नांना न्याय देतानाच कार्यकर्त्यांना न्याय देणे, हा मुख्य अजेंडा काम करताना असणार आहे’ अशी प्रतिक्रिया दिपक मानकर यांनी निवडीनंतर व्यक्त केली आहे.

Deepak Mankar elected as President of Pune City Nationalist Congress Party | Deepk mankar | Ajit Pawar | Sunil Tatkare | ncp

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love