पुरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नवे धोरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

A new strategy for a permanent solution to floods
A new strategy for a permanent solution to floods

पुणे(प्रतिनिधी)- पूरस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तात्पुरते उपाय योजून भागणार नाही. तर याबाबत दीर्घकालीन विचार करावा लागेल. म्हणूनच पुराचा धोका टाळण्याकरिता कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने सरकारकडून नवे धोरण आणणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे दिली.

पुण्यातील पूरस्थिती निर्माण झालेल्या भागाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी बोतल होते. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, तुमच्या घरांना पडणारा पुराचा वेढा दूर झाला पाहिजे. आपल्याला तात्पुरती मदत मिळणे, हे ठीक आहे. परंतु, कायमस्वरुपी धोका दूर होणे आवश्यक आहे. म्हणून सरकारच्या वतीने नवीन डीसीआर आणू, विकास करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. यासंदर्भात आपण योग्य प्रकारे नियोजन करू. तुम्ही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, हीच आमची अपेक्षा आहे. आपल्याला संकटात सगळ्या लोकांनी मदत केली आहे. सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार मदतीला आले. महापालिका, आर्मी, एनडीआरएफ, एनजीओ या सगळ्यांनी मदत केली. त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही विश्वास ठेवा, खात्री बाळगा. आपण नक्कीच कायमस्वरुपी तोडगा काढू. आता आम्ही पूरग्रस्त भागातील नागरिकांना काही कमी पडू देणार नाही. प्रशासन सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  #Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत- चंद्रशेखर बावनकुळे

….म्हणून ठाणे, पनवेल येथील अधिकारी पाठवले

पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर एका महापालिकेवर वा तेथील यंत्रणेवर खूप ताण येतो. चिपळूणला आलेल्या पुराच्या वेळीसुद्धा मी ठाणे, पनवेलच्या अधिकाऱयांना पाठवले होते. त्याप्रमाणे पुण्यात पुराच्या वेळी ठाणे, नवी मुंबई, पनवेल येथील अधिकारी आणि कर्मचारी पाठवले असल्याचे शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.

 मुख्यमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद 

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी एकतानगर, जुनी सांगवी येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. बाधित क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love