अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे नातू कर्जतचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे उपस्थित होते. (Mahatastra Politics Crisis)
एका बाजूला पुतण्याने बंड केल्याचे शल्य असताना त्यांच्या बाजूला नातू रोहित पवार हे उपस्थित होते. त्यामुळे रोहित पवार यांच्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे, राज्यामध्ये मात्र अजित पवार यांना कुठलीही जबाबदारी न देता त्यांना डावलले जात असल्याचे चर्चा सुरू होती
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राज्यातील पक्षाची धुरा इतर नेत्यांबरोबर देतानाच पवारांचा वारसदार म्हणून आमदार रोहित पवार यांच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे. आजच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शरद पवारांच्या इतिहासातील सर्व घटना त्यामध्ये दाखवल्या आहेत. तसेच शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा फोटो त्यामध्ये शेअर केला आहे.
गाव होते बारामती
ना सखा ना सोबती
तरी हा ना थांबला
गडी एकटा निघाला…
हा व्हिडिओ शेअर केला आहे ….
Sharad Pawar | Maharashtra Politics | Maharashtra Politics Crisis | Rohit Pawar