‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’अभियान सर्वसामान्यांसाठी समर्पित

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरु झाले असून, सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी यामधून घेतली जाणार आहे. त्यामुळे याच्या अंमलबजावणीसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे शहर ग्रामीण व पिंपरी-चिंचवड भाजपा वैद्यकीय आघाडीनेच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी घरकुल लॉन्स पुणे येथे राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते.

यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपले, आयुर्वेद डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. तेजस्विनी अरविंद, डॉ. मनिषा जाधव, डॉ. ऐश्वर्या सुपेकर, डॉ. धनंजय जोशी, डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. प्रदीप नरवणे, डॉ. शुभदा कामत, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, डॉ. संदीप वाघ, धर्मेंद्र खंदारे, डॉ. सुनिल चौहान, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, “आयुष्यमान भारतासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ हे अभियान संपूर्ण देशभरात राबिण्यात येत असून, देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य व्यवस्था मिळावे, हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी मिशन म्हणून काम केले पाहिजे, जेणेकरुन देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम स्वास्थ्य लाभेल.” तसेच हे अभियान गावोगावी, वाड्या-वस्त्यांमध्ये पोहोचविण्याचे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.

या कार्यशाळेत डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. सागर पाटणकर, यांनी मार्गदर्शन केले व सोशल मीडियाचा प्रभारी वापर आणि संघटनात्मक बांधणी वर भाजप पुणे शहर प्रवक्ते श्री संदीप खर्डेकर यांचे सत्र पार पडले. तर महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस श्री अॅड. धर्मेंद्र खंडारे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यशाळेत 85 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *