महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशाला दिशा मिळाली, ते व्यक्तिमत्व कायमस्वरुपी सगळ्यांसमोर रहावे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घराघरात पोहोचावी, याकरीता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील. महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य दिन म्हणून साजरा होईल, याकरीता पुढील ८ दिवसात शासकीय अध्यादेश काढण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. पुण्यातील गणेशोत्सवाप्रमाणे शिवजयंती महोत्सव समितीने सुरु केलेला शिवजयंती उत्सव स्वराज्यरथ सोहळा देखील जगभर प्रसिद्ध होईल, असे सांगत समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केलेल्या कार्याची दखल घेत शासनाची देखील काही जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी ही घोषणा केली.

शिवजयंती महोत्सव समिती तर्फे लालमहाल येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिला भगिनींच्या हस्ते शिवरायांना औक्षण करुन झाली. यावेळी पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रताप परदेशी, आमदार दिलीप मोहिते, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, संजय जगताप, प्रवीण परदेशी तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार घालून जिजाऊ मॉं साहेब शहाजी महाराज शिवज्योत प्रज्वलन करण्यात आली. कार्यक्रमाला पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला, लहानमुले, शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.

लालमहालपासून शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकापर्यंत फुलांच्या पायघड्या घालत शिवज्योत नेण्यात आली. सोहळ्याचे यंदा ९ वे वर्ष आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

सोहळ्याला सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुयार्जी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दयार्सारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव,, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे,  स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे,शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे,पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज सहभागी झाले होते.

सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ललित शिंदे, दीपक घुले, रवींद्र कंक, दिग्वीजय जेधे, शंकर कडू, महेश मालुसरे, नीलेश जेधे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दीपक बांदल, किरण देसाई, मंदार मते, प्रवीणभैय्या गायकवाड, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

* सलग १० व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन शिवरायांना ईशान अमित गायकवाड यांनी दिली मानवंदना

शिवजयंतीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर सलग १० व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन ईशान अमित गायकवाड मानवंदना दिली. यावेळी ईशानच्या सोबत आई रिंकल व वडिल अमित सुरेश गायकवाड, सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करणारी ईशानची आत्या सुषमा संजय शिंदे तसेच पलाश शिंदे, रितीका जुनावणे, हंसीका जाधव, रेवा जोगदंड, शूर गायकवाड, वीरा गायकवाड, तन्वी दळवी, सिध्दी दळवी यांनी देखील हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *