#Gita Bhakti Amrit-Mahotsava : परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी जी महाराज यांच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त आळंदी येथे विशाल गीताभक्ति अमृत-महोत्सवाचे आयोजन

Gita Bhakti Amrit-Mahotsava
Gita Bhakti Amrit-Mahotsava

पुणे- परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी जी महाराज( Swami Govindadevgiri Ji Maharaj) यांच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त पवित्र इंद्रायणी नदीच्या(Indrayani River) तीरावर संतनगरी आळंदी(Alandi), पुणे येथे विशाल गीताभक्ति अमृत-महोत्सवाचे ( Gita Bhakti Amrit-Mahotsava) दिनांक 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजन  करण्यात आले असल्याची माहिती गीता परिवाराचे (Geeta Parivar) राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी (Sanjay Malpani) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

( Gita Bhakti Amrit-Mahotsava organized at Alandi)

गीता भक्ती अमृत महोत्सव आयोजन समितीचे कार्याध्यक्ष श्री गिरीधारीजी काळे, गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अंजली तापडिया हे यावेळी उपस्थित होते.

डॉ. संजय मालपाणी महोत्सवाबद्दल माहिती देताना म्हणाले की , “गीता भक्ती अमृत महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून; एक अध्यात्माचा, आपल्या स्वतःच्या भारतीय संस्कृतीचा आणि निस्वार्थभावनेचा महोत्सव आहे.हा महोत्सव आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या भव्यतेचा आणि त्याचा येणाऱ्या पिढ्यांवर होणाऱ्या प्रभावाचा पुरावा आहे. विविध पार्श्वभूमीतील संत, योगी, अध्यात्मिक नेते आणि विचारवंतांच्या या भव्य मेळाव्यामुळे देशाच्या नैतिकतेचे जतन करण्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची अपेक्षा आहे.”

अधिक वाचा  ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर  यांचं निधन

या महोत्सवात दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सकाळी यज्ञविधी पार पडणार आहेत. परम श्रध्येय राजेंद्रदासजी महाराज यांची श्रीमद्भागवत कथा ऐकण्याचा अतिशय दुर्मिळ योग पुणेकरांना यानिमित्ताने लाभणार आहे. दुपारच्या सत्रांमध्ये वेदशास्त्र परिसंवादामध्ये आपले जे महत्वाचे भारतीय ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये नक्की काय सांगितले आणि मानव कल्याणासाठी त्याचा कसा उपयोग होईल,यासाठी देशभरातील विद्वान माहिती देण्यासाठी येणार आहेत. संध्याकाळच्या वेळेमध्ये राष्ट्रभक्ती संमेलन, मातृभक्ती संमेलन, अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे असे भारतातले श्रेष्ठतम वक्ते उपस्थित राहणार असून त्यामध्ये  साध्वी ऋतुंभराजी, पुष्पेंद्र कलाश्रेष्ठजी असे वक्ते आपल्याला यंनिमिताने लाभणार आहेत. सुंदर असे कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम विशेषत: नाटकांचे कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये ‘यह पुण्य प्रवाह हमारा’ ही संत परंपरा आणि रामायण हे 450 हून अधिक कलाकारांचे महानाट्य यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे.

अधिक वाचा  पुण्यात इंडियन प्लंबिंग कॉन्फरन्स अ‍ॅन्ड एक्झिबिशनच्या 28 व्या आवृत्तीचे आयोजन

शेवटच्या दिवशी जो आनंदोत्सव आहे त्यासाठी कांची कामकोठी पिठाचे शंकराचार्य, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, योगगरू स्वामी रामदेवजी महाराज, वेगवेगळे संत महात्मे, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर 100 हून अधिक संत महात्मे या महोत्सवासाठी देशभरतून येणार आहेत त्यांच्या दर्शनाचा लाभ घेण्याची आणि त्यांना ऐकण्याची संधी यानिमिताने मिळणार आहे. याबरोबरच सेवा क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये जीवन दिलेल्या परंतु प्रसिद्धी पराङ्मुख राहिलेल्या 75 सेवा व्रतींचा सन्मान या वेगवेगळ्या कार्यक्रमात केला जाणार असल्याचे संजय मालपाणी यांनी सांगितले.

या महोत्सवाचा मूख्य उद्देश भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणे आणि सहभागींमध्ये एकता आणि सौहार्दाची भावना वाढवणे असल्याचे संजय मालपाणी यांनी सांगितले.   

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love