Yugendra Pawar hints at contesting Baramati Assembly

युगेंद्र पवार यांचे बारामती विधानसभा लढविण्याचे संकेत

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)—लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती तालुक्यात दौरा करत बारामती तालुका पिंजून काढला आहे. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हेही होते. दरम्यान, या दौऱ्यादरम्यान युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत.

बारामती लोकसभा निवडणुकीनंतर  बारामती मतदारसंघातील  राजकारण बदलून गेले आहे. अजित पवारांच्या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना ५० हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. शरद पवार हे युगेंद्र पवारांना घेऊन आतापासूनच मैदानात उतरले आहेत. पवारांनी संपूर्ण तालूका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हेच मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान काटेवाडीत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, ” संपूर्ण बारामती आपलं घर असलं, तरीसुद्धा आपलं मूळ गाव काटेवाडी आहे. सर्वांत दबाव काटेवाडी, कन्हेरीमध्ये झाला. इथल्या अनेक स्थानिक पुढाऱ्यांकडून झाला. तुम्हाला सोपा प्रश्न आहे, की साहेब बारामतीचे नसते, तर आज बारामती अशी असती का? साहेबांमुळे बारामतीचा खरा विकास झाल्याचे यावेळी युगेंद्र पवार यांनी नमूद केले.

मंत्रालयात तुम्ही काटेवाडीचे आहेत असं सांगितलं, की लगेच खुर्ची आणि मान मिळतो. आताच्या वेळी पैशांचा वापर झाला; पण ३ महिन्यांनी तुम्ही त्यांना दाखवून द्या, की १०० मतांनी आपण पुढे कसं पाहिजे.’ तुम्ही अजिबात कमी पडला नाहीत, तुम्हाला धन्यवाद म्हणतो, अशा शब्दांत युगेंद्र पवार यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत दिले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *