मराठा आरक्षण: 5 जूनला निघणारा मोर्चा मुक नव्हे तर बोलका मोर्चा – विनायक मेटे

राजकारण
Spread the love

पुणे –मराठा आरक्षण रद्द होण्या बाबत सगळा गाढवपणा हा राज्य सरकारने केला आहे, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे झाले अशी टीका करत सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून दि.५जून रोजी निघणारा “बीड” येथील पहिला मोर्चा हा मूक मोर्चा नसेल तर बोलका मोर्चा असेल.  या मोर्चात आम्ही आमच्या अन्यायाचा जाब विचारू, आमचे हक्क, अधिकार यावर नक्की बोलू आणि सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे.

राज्यातील प्रत्येक तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना “इशारा निवेदन” देऊन शिवसंग्रामच्या वतीने १५ दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीत सरकारने समाजाच्या भल्यासाठी एकही पाऊल उचलले नसल्याने दि.५जून रोजी निघणारा “बीड” येथील पहिला मोर्चा निघणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सर्व मराठा संघटना, क्रांती (मूक/ठोक) मोर्चा व जे जे पक्षीय कार्यकर्ते जे पक्षीय गुलामी सोडून, “मराठा” म्हणून येतील ते या मोर्चात “मराठा” म्हणून सहभागी होऊ शकतात असेही ते म्हणाले.

आज “सारथी” संस्थेसंदर्भात आ.विनायक मेटे तसेच सारथीचे संचालक अजित निंबाळकर व कार्यकारी संचालक अशोक काकडे यांची पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीला विद्यार्थी प्रतिनिधीही हजर होते. पीएचडी च्या २४१ मुलामुलींची फेलोशिप गेली १ ते दिड वर्षे मिळालेली नाही. एम.फील. हा कोर्स केंद्राने बंद त्यांचीही कुचंबणा होतेय. त्यांना Phd करण्याची परवानगी मिळावी ही मागणी प्रलंबित आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी फेलोशिपच्या आधारावर मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून संशोधनाला वाहून घेतले त्यांच्यावर आता वेगवेगळे संशोधन थांबविण्याची वेळ आलीय. याकडे मेटे यांनी लक्ष वेधले.यावर, दि.१जून रोजी सारथीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन हे निर्णय तातडीने घेण्यात येतील अशी हमी संचालकांनी दिली.

बार्टी या संस्थेने घेतलेले निर्णय तपासून त्याप्रमाणे सारथी संस्थासुद्धा रजिस्ट्रेशन झाल्यापासून फेलोशिप सुरू करतील व हा निर्णयही १जूनच्या बैठकीत नक्की घेऊ तसेच त्याच बैठकीत संस्थेला मान्यता मिळालेली ४१ पदे भरण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन आज देण्यात आले. (सध्या फक्त ५/६ कर्मचारी या महत्वाकांक्षी प्रकल्पात सेवेत आहेत.)

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच सारथीचा कारभार हाती घेतला असून ते समाधानकारक निर्णय घेत आहेत. मी अजितदादा यांचे सोबत नुकतीच भेट घेऊन सारथीची स्वायत्तता ही मागणी केली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी संचालक निंबाळकर यांना सूचना देत सर्व प्रश्न सोडवा असे सांगितले आहे.अजितदादा पवार यांनी सारथी संस्थेला निधी दिला तसेच संस्थेसाठी स्वतःची अशी जागा, पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध केली हे समाधानकारक आहे असेही मेटे म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *