#हाथरस .. तर तुम्हाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही


मुंबई—हाथरस येथील पिडीत मुलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्काराच्यावेळी नातेवाईकांना उपस्थित राहू न दिल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले जात आहे. राज्यातही याबाबत प्रतिक्रिया उमटल्या असून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट वरुण संताप व्यक्त करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्यावर निशाणा साधला आहे. भारताच्या पीडित मुलीच्या पार्थिवावर रात्रीतून कुटुंबातील व्यक्तींच्या अनुपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले ही योगी सरकारचे अमानवी कृत्य असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मुलीना ना जिवंतपणी सन्मान दिला जातो ना मेल्यानंतर असे ट्वीट करून जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत असतील तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेतली पाहिजे.

अधिक वाचा  एकनाथ खडसेंनी दिला भाजपचा राजीनामा? चंद्रकांत पाटील म्हणतात ..

तुम्ही न्याय, सन्मान आणि समानतेचे राज्य निर्माण करु शकत नाही तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताच अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love