Don't judge my age; I will not stop - Sharad Pawar

#Sharad Pawar : माझे वय काढत बसू नका; हा गडी थांबणारा नाही- शरद पवार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Sharad Pawar –विरोधक म्हणतात यांचे वय आता ८२, ८४ झाले. आता काय त्यांच्यावर अवलंबून रहायचे. भाषणात मी ८४ वर्षांचा योद्धा असल्याचे सांगितले गेले. परंतु माझे सांगणे आहे, की माझे वय काढत बसू नका. हा गडी थांबणारा नाही. विधानसभा(Vidhansabha), लोकसभा(Loksabha), राज्यसभा(Rajyasabha) या तिन्ही ठिकाणी काम करताना मी मागील ५६ वर्षात एक दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. शेतात काम करणाऱया बैलालाही पोळय़ाची दिवशी सुट्टी असते. मी राजकीय जीवनात सुट्टीपासून कायम दूरच राहिलो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी आपला राजकीय पट सोमवारी मांडला.

बारामती लोकसभा(Baramati Loksabha) मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांनी उंडवाडी कडेपठार येथे दुष्काळी दोरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी पवार म्हणाले, माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात मी १९६५ पासून केली. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर या परिसरात काम करण्याची इच्छा होती. त्यानुसार दुष्काळी भागात पाणी वाचविण्यासाठी काम करू लागलो. सुमारे ३०० तलाव त्याकाळी तयार झाले व जे काही पाणी पावसाळय़ात पडले, ते साठवले गेल्याने काही भाग बागायती झाला व लोकांना एकप्रकारे जगण्याचे साधन मिळाले.

नंतरच्या काळात मी १९६७ मध्ये विध्नानसभेत गेलो. नंतर राज्यात स्थिती बदलली. कधी मंत्री झालो, कधी मुख्यमंत्री झालो, केंद्र सरकारमध्ये गेलो, देशाच्या संरक्षण खात्यात काम करण्याची संधी मिळाली व मला शेवटची दहा वर्षे शेती मंत्री म्हणून काम करता आले. तत्कालीन पंतप्रधन मनमोहन सिंग यांच्याकडून मी शेती खाते मागून घेतले व दहा वर्षे शेतीचे काम माझ्याकडे आले. देशात त्यावेळी अन्नधान्य परिस्थिती बिकट होती. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशातील शेतकऱयांच्या सहकार्याने अन्नधान्य उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो. शेतकऱयांचे ७१ हजार कोटीचे कर्ज आम्ही माफ केले, व्याजाचे दर कमी केले, नवीन बी-बियाणे दिल्याने देशातील अन्नधान्य उत्पादन वाढले. 

नंतरच्या काळात देशात सत्ता बदलली, लोकशाहीत सरकार येतात, जातात. बारामतीला मी १९७१ साली कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे ज्ञान मिळविण्यास येतात. विद्या प्रतिष्ठानमध्ये ३५ हजार मुले-मुली आज शिक्षण घेत आहे. संताऱ्यातील  रयत शिक्षण संस्थेची एकूण ७५  कॉलेज व ३०० हायस्कूल आहेत. त्यात चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी ज्ञानदानाचे काम केले.

अशा हुकूमशाहीने देशाचे चित्र बदलेल

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांना शेती मंत्री असताना प्रचंड मदत केली. मोदींनीही आपले बोट धरून राजकारणात आल्याचे सांगितले. आज तेच पंतप्रधान वेगळी भूमिका घ्यायला लागले आहेत. राजकारणात वेगळय़ा विचाराची कुणी भूमिका घेतली, तर त्याच्याबद्दल आकस वा कारवाई करणे, हे खिलाडूपणाचे लक्षण नाही. अशा हुकूमशाहीने देशाचे चित्र बदलेल आणि सत्ता ही मूठभर लोकांच्या हातात जाईल, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली. 

तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे

‘घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही’, असा मजकूर असलेली चिठ्ठी शरद पवारांनी भर सभेत वाचून दाखवली. आणि ‘अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे. कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुनही शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. “जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांनी ती पार पाडली नाही. मी गेली २० वर्षे स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु आता लक्ष घालून मी माझी जबाबदारी पार पाडेन. बारामतीच्या जिरायत भागाने नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे या माझ्या माणसांचे प्रश्न सोडवणे ही माझीच जबाबदारी आहे’ असेही शरद पवारांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *