कोणत्या देवाने सांगितल की मुलं आर्ध्या चड्डीत आल्यावर त्यांना दर्शन घेऊ देऊ नका- अजित पवार

पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला

पुणे- राज्यातील काही मंदिरांमध्ये कुठले कपडे घालून मंदिरात यावे अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आम्ही शालेय जीवनात असताना दहावी पर्यंत आम्हाला हाफ पॅन्टवर जावं लागत होतं. लहान मुलांनी हाफ पॅन्ट घातली म्हणून मंदिरात प्रवेश नाही ही कुठली पद्धत काढली आहे? कोणत्या देवाने सांगितल की मुलं अर्ध्या चड्डीत आल्यावर त्यांना दर्शन घेऊ देऊ नका?”, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. “काहीजण या गोष्टीचा बाऊ करत आहेत. तुळजापूर येथे जे काही घडले ते आक्षेपार्ह आहे.यात तातडीने सरकारने लक्ष दिला पाहिजे. तसंच तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी देखील लक्ष घातलं पाहिजे. ज्याने नवीन प्रश्न निर्माण होतील अशी बंधने आणली नाही पाहिजे “,असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  एस.टी. कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप करावा - जयप्रकाश छाजेड यांची मागणी

त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या घटनेबाबत बोलताना पवार म्हणाले की,  कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर आपण बघितलं की बजरंग बली यांना डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी भाजपकडून प्रचार करण्यात आला.सभेला जात असताना तिथं जाणीवपूर्वक बजरंगबलीची मूर्ती देण्यात आली. पंतप्रधान यांनी देखील आवाहन केल की बजरंग बलीला डोळ्यासमोर ठेवून बटण दाबा.  पण तसं काहीही झालं नाही. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी असून मधल्या काळात त्र्यंबकेश्वरला, शेवगांव तसेच अकोल्याला जे घडल आहे, ते पाहता अश्या घटना घडता कामा नये. यात राज्य सरकारची महत्त्वाची जबाबदारी आहे. कोणीही भावनिक मुद्दा पुढे करून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर या राज्यातील जनता ते कदापि सहन करणार नाही. त्र्यंबकेश्वर  येथे काही संघटना पुढे आल्या आणि त्यांनी गोमूत्र शिडकल.  कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .या राज्यात सर्वच जाती धर्मातील लोक हे गुण्यागोविंदाने राहत आहे. आपण पण अजमेर येथे चादर चढविण्यासाठी जात असतो. आपल्या प्रत्येकाबाबत आदर आहे. त्र्यंबकेश्वरबाबत स्थानिकांनी सांगितल की तिथं ही परंपरा १०० वर्षापूर्वीची आहे. आणि आत्ता अशा गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत.  तसेच सोशल मीडियाचा वापर करून समाजात तेढ निर्माण केलं जातं आहे.जे कोणी मास्टर माईंड असेल त्याने हे सर्व थांबविल पाहिजे,अस यावेळी पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love