#Devendra Fadnavis : तुतारी कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच – देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी यांनी परभणीला भेट देऊन त्यांचं विद्वेषाचे काम पूर्ण केलेलं आहे
राहुल गांधी यांनी परभणीला भेट देऊन त्यांचं विद्वेषाचे काम पूर्ण केलेलं आहे

#Devendra Fadnavis : “मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार(Sharad Pawar ) रायगडावर(Raigad) गेले. अजित पवारांना (Ajit Pawar)याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chatrapati Shivaji Maharaj) चरणी नमन करण्यासाठी शरद पवारांना जावं लागलं. आता तुतारी(trumpet) कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी जेष्ठ नेते शरद पवारांना उपरोधिक टोला लगावला.(Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future)

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. या चिन्हाच्या अनावरणाचा सोहळा राष्ट्रवादीकडून किल्ले रायगडावर ठेवण्यात आला होता. या सोहळ्यासाठी तब्बल ४० वर्षांनंतर शरद पवार रायगड किल्ल्यावर गेले. यावरुन पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार रायगडावर गेले. अजित पवारांना याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करण्यासाठी जावं लागलं.”

अधिक वाचा  अन्यथा आम्ही अमिताभ आणि अक्षयचे चित्रपट बंद पाडू- का म्हणाले नाना पटोले असे?

राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ला ते भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे. ‘पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला. या कामगिरीसाठी पुणे पोलिसांचं विशेष अभिनंदन त्यांनी केलं. त्यासोबतच त्यांनी शरद पवारांच्या रायगडावरील चिन्हाच्या अनावर सोहळ्यावर टीका केली.

“पुणे पोलिसांचे अभिनंदन करायला हवे. पोलिसांनी अतिशय शिताफीने अमली पदार्थांचा साठा शोधून काढला आहे. सरकारकडून ‘झिरो ड्रग्ज पॉलिसी, नो टोलरन्स फॉर ड्रग्ज’ असे धोरण आखले आहे. केवळ मुद्देमाल पकडून थांबू नका, तर त्याही पुढे जाऊन त्याच्यापाठी असलेल्यांना शोधून काढण्याचे आदेश गृहखात्याने दिले होते. नेमकं ते काम पोलिसांनी केलं. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा मिळाला. पुणे पोलीस आता केंद्राच्या नार्कोटिक्स विभागाबरोबर काम करून आणखी खोलात जाऊन तपास करणार आहेत. अनेक राज्यात अमली पदार्थाविरोधी कारवाई करणे आवश्यक आहे. पुणे पोलिसांच्या यशामुळे देशभरातील कारवायांना बळ मिळणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love