#Sunetra Pawar : ‘अजित पवार(Ajit Pawar) यांना अशीच साथ देण्याची गरज आहे. भविष्यातही तुम्ही ही साथ देणार, याची मला खात्री आहे. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी मलाही खूप प्रेम दिलेलं आहे. त्यातून उतराई होण्यासाठी तुम्ही मला संधी द्याल, अशी अशा बाळगते’, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांनी बारामती(Baramati) येथील एका कार्यक्रमात केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर बारामती या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यावरुण उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
‘मी तुमची सून असूनही मला तुम्ही जीव लावला. याला उतराई होण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. बारामतीकर, काटेवाडीकर येथील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी अजित पवार सतत प्रयत्न करत असतात. इथून पुढेदेखील त्यांचा हाच प्रयत्न राहील’, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.