Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

अडाणी उद्योग समूहाला दिलेली लाखो कोटी रुपयांची कर्जे कंपनीच्या ताळेबंदाची कशा प्रकारे गुणवत्ता बघून दिली.? या बाबत मोदी सरकारने त्वरित खुलासा करावा- गोपाळदादा तिवारी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे – , “सरकारी बँका, आयुर्विमा महामंडळ इत्यादी मधून “अडाणी उद्योग समूहाला” जी लाखो कोटी रुपयांची कर्जे दिली ती कंपनीच्या ताळेबंदाची कशा प्रकारे गुणवत्ता बघून दिली.? या बाबतमोदी सरकारने त्वरित खुलासा करावा अशी मागणी कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. दरम्यान, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील संपत्ती व मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्ती देखील केवळ २/३ घराण्याकडेच सुपुर्त करण्याचे कारस्थान हे लोकशाहीसाठी, देशाची सार्वभौमता व देशातील जनतेवर लादल्या जाणाऱ्या महागाई – बेकारीच्या संकटांचे निमंत्रक ठरतील व तसा प्रत्यय येऊ लागला आहे अशी टीकाही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. 

तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशाचा ७४ वा “प्रजासत्ताक दिन” काल नुकताच साजरा झाल्यावर व अडाणी समुहाच्या आर्थिक घोटाळ्याच्या बातम्या काल माध्यमांत प्रसिध्द झाल्यावर आज “स्टॅाक मार्केट” पहील्या तीन तासांतच निफ्टी तब्बल ३५० हुन अधिक व सेंनसेक्स सु १००० पेक्षा ही जास्त पडला.. गेल्या ३ महीन्यात ही मार्केट मोठ्या प्रमाणात पडण्याची ही दुसरी तीसरी वेळ आहे.

अमेरीकेतील ख्यातनाम “हिंडेनबर्ग या रिसर्च कंपनी ने गेल्या ४/५ वर्षात जगात ३ ऱ्या श्रीमंत झालेल्या अडाणी ग्रूप ला ८८ प्रश्न विचारले. पैकी त्यांना एकाचेही उत्तर मिळु शकले नसल्याचा दावा सदर अमेरीकेतील रीसर्च कंपनीने केला असुन, अडाणीग्रूप चे सीए ॲाडीटर्स हे फारसा अनुभव वा जेष्ठता नसलेले दोन २३ व २४ वर्षांचे तरूण आहेत. या विषयीचा त्यांचा आक्षेप हा गंभीर असल्याने त्यावर अडाणी ग्रूपने तातडीने खुलासा करण्याची व देशातील अग्रगण्य ऊद्योगपती म्हणून ‘आर्थिक पत’ वाचवण्याची गरज आहे आणि ते देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहे.  अन्यथा, अडाणी ग्रूपमधील बहुतांश गुंतवणुकदारांनी धास्तीने अडाणी प्रकल्पां मधील विक्री मोठ्या प्रमाणात सुरू केली नसती. अडाणी ग्रूप या संधीचा लाभ घेऊन स्वतः शेअर्स पुन्हा खरेदी देखील करतील ही, मात्र सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मात्र या ऊदभवलेल्या मार्केटच्या बिकट परिस्थिती मुळे नुकसान सोसुन शेअर्स विकावे लागतात ही खेदाची बाब असल्याचे तिवारी यांनी म्हटल आहे.

यातून पुन्हा देशातील सर्वसामान्य जनतेकडे असलेल्या मालकीचे शेअर्स पुन्हा एकाच घराण्याच्या मालकीचे होणार व हे अनिष्टचक्र पुन्हा सुरू राहणार याचे आर्थिक पडसाद उमटत राहणार या आर्थिक अनिष्ट प्रकारांमुळे सामान्य-जणांच्या आर्थिक बरबादीच्या कारणांचा बोध व संदेश देखील देशातील जनतेने योग्य वेळीच घ्यावा असे आवाहन देखील गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केले आहे.  

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *