सौ.प्रमोदिनी अमृतवाड यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने लौकिक मिळविला- आमदार डॉ. सुधीर तांबे

क्रीडा पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- क्रीडा क्षेत्रासारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये एक उत्तम प्रशासक म्हणून आपल्या कार्य कर्तुत्वाने लौकिक मिळवतानाच एक उत्तम गृहिणी, उत्तम पत्नी, उत्तम आई, उत्तम सून म्हणूनही आपली सर्व कर्तव्ये राज्याच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालयाच्या सेवानिवृत्त उपसंचालिका सौ.प्रमोदिनी अरुण अमृतवाड यांनी पार पाडली असे गौरोद्गार नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी काढले.

सौ.प्रमोदिनी अरुण अमृतवाड या उपसंचालिका क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन म्हणून नुकत्याच निवृत्त झाल्या. त्यानिमिताने आयोजित सेवापूर्ती गौरव समारंभामध्ये डॉ. तांबे बोलत होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन पुणेने आयोजित केलेल्या  शासकिय सेवापूर्ती समारंभात क्रीडा  सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक अनिल चोरमले, उपसंचालक सुहास पाटील, उपसंचालक.नवनाथ फरताडे, उपसंचालक सौ.निलीमा अडसुळ, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, सोलापुर नितिन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर सौ.भागश्री बिले कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी, संगमनेर प्रकाश मोहरे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्य राजाराम राऊत, अखिल भारत पद्मशाली धर्मशाळा श्रीक्षेत्र पंढरपूरचे अध्यक्ष चंद्रकांत मिठ्ठापल्ली, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाज संघम पुणेचे माजी अध्यक्ष व पद्मशाली भवानी पेठ सरपंच वसतराव येमुल, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ अहमदनगर ( मार्कंडेय विद्यालय)चे अध्यक्ष शरदशेठ क्यादर, प्रमुख विश्वस्त मुकुंद सिंगारम, श्री मार्कंडेय शिवालय वडगावशेरी अध्यक्ष देविदास अंकम, पद्मशाली समाज मंडळ संगमनेरचे अध्यक्ष नारायण इटप, व विशेष अतिथि पुणे शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा सौ.पूजा मनिष आनंद हे यावेळी उपस्थित होते.  सेवापूर्ती निमित्त सौ.प्रमोदिनी अमृतवाड सेवापुर्ती गौरव समितीच्या वतीने त्यांच्या कार्याच्या गौरवाविषयी विविध अधिकारी, मित्र- मैत्रिणी, नातेवाईकांनी शब्दबद्ध केलेल्या ‘यशोगाथा’ या स्मरणिकेचे विमोचन यावेळी करण्यात आले. क्रीडा कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन महेश चावले यांनी केले. हे मानपत्र  सहसंचालक चंद्रकात कांबळे यांच्या हस्ते व गौरव समितीच्या वतीने सौ.प्रमोदिनी अमृतवाड यांना प्रदान करण्यात आले.  

डॉ. तांबे म्हणाले, सौ.प्रमोदिनी अरुण अमृतवाड यांनी क्रीडा क्षेत्रात करिअर केले हे अत्यंत अभिनंदनीय आहे. क्रीडा क्षेत्र हे अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे. बऱ्याच वेळा आपण शासनाने काहीतरी करावे म्हणून वाट पहात बसतो. संबंधित क्षेत्रात अनेक गोष्टींसाठी आपण संघर्ष करतो. जिथे कमतरता असते तिथे संघर्ष केलाच पाहिजे, तो आपला अधिकार आहे परंतु, ते करत असताना सर्वकाही शासनानेच केले पाहिजे असे गृहीत धरणे योग्य नाही. त्यासाठी समाज म्हणून सर्वांनी पुढे आले पाहिजे. क्रीडा क्षेत्रामध्येही आपल्याला केवळ शासनावर अवलंबून राहता येणार नाही तर त्यामध्ये समाजाचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी क्रीडा चळवळ उभी केली पाहिजे आणि त्यासाठी सौ.प्रमोदिनी अरुण अमृतवाड यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉ. तांबे यांनी यावेळी केले.   

सौ.प्रमोदिनी यांनी सत्कारास उतर देतांना आपल्या मनोगतात ३१ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये घडलेल्या अनेक प्रसंगांचे स्मरण करताना सहकारी अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. शासनाच्या सेवेत असताना राज्याच्या विविध भागात जबाबदारी पार पाडताना कौटुंबिक जीवनात झालेली ओढाताण आणि अशा परिस्थितीत पती, दोन मुली आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी दिलेली साथ यामुळेच आपण ही जबाबदारी निभाऊ शकलो अशी कृतज्ञता व्यक्त केली.

पद्मशाली समाजाच्या वतीने वसंतराव येमूल,पुणे शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा सौ.पूजा मनिष आनंद यांनी मनोगत व्यक्त केले. सौ.प्रमोदिनी अमृतवाड यांचे पती अरुण अमृतवाड यांनी पत्नी, आई आणि सून म्हणून आणि एक शासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना सौ.प्रमोदिनी अमृतवाड यांनी या जबाबदाऱ्या किती कौशल्याने पार पाडल्या हे सांगतानाच पती- पत्नी म्हणून त्यांना किती कसरती कराव्या लागल्या याबाबतचे प्रसंग कथित केले. मुलगी वैष्णवीने क्रीडा अधिकारी म्हणून राज्याच्या विविध भागात नोकरीला असतानाही आईचे प्रेम कसे मिळाले याबद्दलच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. अरुण अमृतवाड यांच्या क्लासिक ग्रुपच्या वतीने मित्र रवींद्र पवार, सौ.प्रमोदिनी यांच्या सहेली ग्रुपच्या वतीने सौ.मंज्जू दिपक मणियार, सोलापुरचे नागार्जुन चिलवेरी, अनील चोरमले,सुहास पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्र संचलन निवेदिका सौ.स्मिता गुणे यांनी केले तर गौरव समितीच्या वतीने अरुण अमृतवाड व सोलापुर जिल्हा क्रीडा अधिकारी नितिन तारळकर यांनी आभार  मानले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *