ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? – शरद पवार

This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारून आत्महत्या केली होती. महाविकास  आघाडी सरकार मधील मंत्र्याशी  असलेल्या संबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तर भाजपने हे प्रकरण लावून धरत या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे नाव या घटनेशी जोडले गेल्याने आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांची अडचण झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या, “पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवार गप्प का आहेत? या प्रश्नाबाबत विचारले असता त्यांनी या दोन्ही प्रकरणांबद्दल बोलण्याचे टाळत, ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? अशी टिप्पणी केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  खळबळजनक : जीवश्य कंठस्य मैत्रिणींनी केली एकाच वेळी आत्महत्या